Home » Blog » Stock market hike : शेअर बाजारात चार वर्षांतील उच्चांक

Stock market hike : शेअर बाजारात चार वर्षांतील उच्चांक

बीएसई सेन्सेक्समध्ये २९७५ अंकांची वाढ

by प्रतिनिधी
0 comments
Stock market

मुंबई : प्रतिनिधी : भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधी आणि अमेरिका चीन व्यापार करारातील प्रगतीमुळे सोमवारी (१२ मे) भारतीय शेअर बाजाराने जोरदार तेजी पहायला मिळाली. भारत-पाकिस्तान युद्धबंदी आणि अमेरिका-चीन व्यापार करारातील प्रगतीमुळे निफ्टी५० आणि बीएसई सेन्सेक्स या भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांनी व्यापारात जोरदार वाढ केली. (Stock market hike)
देशांतर्गत स्थिरता आणि अनुकूल जागतिक बातम्यांमुळे दोन्ही निर्देशांक ३.५% पेक्षा जास्त वाढले आणि गेल्या ४ वर्षातील सर्वात मोठी वाढ नोंदवली. निफ्टी५० २४,९०० च्या वर गेला, तर बीएसई सेन्सेक्स ८२,४०० च्या वर गेला. निफ्टी५० ९१७ अंकांनी म्हणजेच ३.८२% ने वाढून २४,९२४.७० वर बंद झाला. बीएसई सेन्सेक्स २,९७५ अंकांनी (३.७४%) वाढून ८२,४२९.९० वर बंद झाला.
अमेरिकन व्यापार करार आणि भारत पाकिस्तानमधील तणावामुळे गेले काही दिवस शेअरबाजारावर अनिश्चितेचे वारे वहात असताना आज सोमवारी पहिल्याच दिवशी बुद्ध पोर्णिमेला शेअर बाजाराने चांगलीच उसळी घेतल्याने गुंतवणूकदार खूष झाले. (Stock market hike)

देशांतर्गत स्थिरता आणि अनुकुल जागतिक वातावरणांमुळे दोन्ही निर्देशांक सुरूवातीच्या सत्रात दोन टक्क्यांपेक्षा जास्त वधारले. निफ्टी २४ हजार ७०० च्यावर गेला तर बीएसई सेन्सेक्सने ८१ हजार ८०० पर्यंत उसळी घेतली होती.

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीमुळे बाजारात तीव्र तेजीचा मार्ग मोकळा झाला. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष वाढला होता. तेव्हा शेअर बाजारातील व्यवहारावर चांगलाच परिणाम दिसून आला होता. जेडीपीमध्ये वाढ होण्याची शक्यता, महागाई आणि व्याजदरात घट यामुळे देशांतर्गत बाजारात तेजी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बँका आणि वित्तीय संस्थाच्या शेअरमध्ये तेजी दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Stock market hike)

शुक्रवारी तीन ट्रेडिंगमध्ये निफ्टी सुमारे दीड टक्क्यांनी घसरला होता. पण शनिवारी सायंकाळी शस्त्रसंधीची घोषणा झाली. रविवारी लष्करी कारवाया स्थगित झाल्याने सोमवारी गुंतवणूकदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अमेरिकना आणि चीन यांच्यातील व्यापारी चर्चेमुळे अशियाई बाजारांमध्ये जवळपास एक टक्का वाढ झाली आहे. भारतीय बाजारपेठेत औषध निर्माण आणि आरोग्यसेवा वगळता सर्व प्रमुख क्षेत्र निर्देशांकामध्ये सकारात्मक वाढ दिसून आली आहे. अदानी पोर्टस् ॲक्सिस बँक, एल अँड टी, बजाज फायनान्स आणि एनटीपीसी यांनी तीन ते चार टक्के वाढ नोंदवली आहे.

अमेरिका चीन व्यापार चर्चेतील सकारात्मक घडामोडीमुळे तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. जागतिक स्तरावरील मोठा पेट्रोलियन ग्राहकांकडून मागणी वाढल्याचे दिसून येते. ब्रेंट क्रूड २७ सेंट वाढून प्रति बॅरेल ६४.१८ डॉलरवर पोहोचले आहे.

बाजार वधारण्याची महत्त्वाची कारणे

  • भारत-पाकिस्तान युद्धबंदीमुळे अनिश्चितता कमी झाली
  • अमेरिका-चीन व्यापार चर्चेनंतर जागतिक जोखीम भावना सुधारली
  • एसआयपी गुंतवणूक नवीन उंचीवर पोहोचली
  • सर्व क्षेत्रांतील बाजारपेठेत व्यापक तेजी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00