Home » Blog » वाघिणीच्या हल्ल्यात चार महिला ठार

वाघिणीच्या हल्ल्यात चार महिला ठार

by प्रतिनिधी
0 comments
Four women killed in tigress attack

चंद्रपूर : तेंदूपता तोडण्याचे काम करत असताना वाघिणीच्या हल्ल्यात चार महिला ठार झाल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात ही घटना घडली. वाघाच्या दहशत आणि केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. (Four women killed in tigress attack)

मिळालेल्या माहितीनुसार गुंजेवाही जंगलात १२ महिला तेंदूपत्ता तोडण्यासाठी एकत्र गेल्या होत्या. तेंदूपत्ता तोडण्याचा काम सुरू असताना वाघिणींने महिलांवर हल्ला केला. यावेळी सर्व महिला तेंदूपत्ता तोडण्याच्या कामात व्यस्त होत्या. वाघिणीच्या हल्याने महिला घाबरल्या आणि सैरावैरा पळत सुटल्या. पण वाघाच्या हल्ल्यात चार महिला सापडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. (Four women killed in tigress attack)

१३ महिलांपैकी एक महिला ओरडत गावात आली. तिने गावकऱ्यांना झालेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी जंगलाकडे धाव घेतली. तिथे चार महिलांचे मृतदेह आढळून आले. इतर महिला सुखरुप मिळाल्या. वन विभाग या घटनेचा तपास करत आहे. यापूर्वी १० मे २०२५ मध्ये सिंदेवाही तालुक्यातील मेंढा जंगलात तीन महिलांचा वाघांनी बळी घेतला होता. त्यानंतर एक वर्षात ही दुसरी घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. (Four women killed in tigress attack)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00