वाळवा : प्रतिनिधी : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचा ४३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांच्या हस्ते झाले. यावेळी कारखान्याचे आजी-माजी संचालक, हुतात्मा शिक्षण व उद्योग समुहातील संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते, सभासद शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वैभव नायकवडी म्हणाले, २०२५-२६ या गळीत हंगाम कारखान्याचे सहा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ठ आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी कारखान्यास सहकार्य करावे. कारखान्यातील मेन्टेन्सची, ओव्हरहॉलिंगची कामे पुर्ण होऊन कारखाना गळीतासाठी सज्ज आहे. तोडणी वाहतूकीची सर्व यंत्रणा कारखाना साईटवर हजर झालेली आहे. सुरुवातीच्या काळात कारखान्यातील बॉयलरचे प्रेशर टिकवण्यासाठी आवश्यकतो ऊस पुरवठा करावा, केनयार्डात ऊसाचा पुरेसा बॅलन्स असावा अशी सुचना त्यांनी यावेळी शेती विभागाला दिली. (Vaibhav Nayakwadi)
कारखान्यातील तांत्रिक अधिकाऱ्यांनी सिझन सुरु झालेपासून बंद होईपर्यंत कारखान्यात स्टॉपेजेस येऊ देऊ नयेत. पुर्ण क्षमतेने ऊसाचे गाळप करावे. शेतकऱ्याकडून ऊस तोडीसाठी जर तोडणी यंत्रणेने जर पैसे घेतले तर त्याची खात्री करुन सदरचे पैसे तोडणी वाहतूकदाराच्या बिलातून वसूल करुन संबंधीत शेतकऱ्याला परत देणेत यावेत. याबाबत सर्व गावातील शेतकरी, कार्यकर्ते यांनी जागृत्ती करावी व सतर्क रहावे. डिस्टीलरीतील बायोगॅस पासून सी.बी.जी.प्रकल्प उभारणीस शासनाचे प्रोत्साहन असलेने आपले सी.बी.जी. प्रकल्प उभारणीचे नियोजित आहे. गळीताचे दिवस कमी-कमी होत असलेने कमीत-कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप होणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील घ्यावयाच्या ऊसाचे प्रमाण ठरवून आपणास गळीताची उद्दिष्ठपुर्ती करावयाची आहे त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. शेतकरी संघटनेने आंदोलनाच्या वेळी शेतकऱ्यांच्या वाहनांचे, बैलगाडीचे नुकसान करुन नये. (Vaibhav Nayakwadi)
आर्थिक अडचणीतून साखर उद्योग बाहेर पडणेसाठी शासनाने साखरेचा किमान विक्रीदर (एम.एस.पी.) ४५००रुपये प्रति क्विंटल करावी. औद्योगिक कारणासाठी वापरत असलेल्या साखरेचा दर हा घरगुती वापराच्या साखरेपेक्षा जास्त ठेऊन दुहेरी दराचे धोरण अवलंबावे. कारखान्यांना येत असलेले शॉर्ट मार्जीन भरुन काढणेसाठी कारखान्याच्या सर्व कर्जाचे व्याजदर हे ४ % पर्यंत असावे. गोपीनाथ मुंढे महामंडळाची वर्गणी जास्त आहे ती कमी करावी. सवलतीच्या साखरेवरील इन्कम टॅक्स माफ करावा. इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ करावी. सध्या ऑईल कंपन्यांनी धान्याधारीत इथेनॉल खरेदीचा कोठा जास्त व मोलॅसिस, सिरप पासूनच्या इथेनॉलचा कोठा कमी दिला आहे त्यामध्ये दुरुस्ती करुन सदरचा कोठा पुर्वी सारखा करावा. (Vaibhav Nayakwadi)
यावेळी बोलताना संचालक गौरव नायकवडी म्हणाले, प्रतिदिनी पुर्ण क्षमतेने गाळप करावे. परभागातून आलेल्या ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेशी आपलेपणाने/माणुसकीने वागून त्याची काळजी घ्यावी. यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन महादेव कांबळे, व्हा.चेअरमन रामचंद्र भाडळकर, युवा नेते वीरधवल नायकवडी, कारखान्याचेआजी-माजी संचालक, हुतात्मा शिक्षण व उद्योग समुहातील सर्व संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक व कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यकारी संचालक शिवाजी पाटील यांनी स्वागत केले व सेक्रेटरी मुकेश पवार यांनी सुत्र संचालन केले.