जमीर काझी : मुंबई : मुंबई महापालिकेच्या तीन वर्षाच्या प्रशासकीय काळात सत्ताधारी युतीच्या आमदार-खासदारांना ३०० कोटीच्या निधी दिला असल्याची बाब माहितीच्या अधिकार कायद्यातून मिळालेल्या माहितीतून समोर आली आहे. याबाबत अनिल परब यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करीत सरकारला धारेवर धरले.
मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक राज्य आल्यानंतर विविध कामासाठी आमदार आणि खासदार यांना मुंबई महानगरपालिकेतर्फे नियमितपणे निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र त्यामध्ये केवळ सत्ताधारी खासदार आणि आमदार यांनाच हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि एनसीपीचे लोकप्रतिनिधी निवडून आलेल्या मतदारसंघात कटाक्षानं हा निधी टाळल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे. (Anil Parab Launches a Fierce Attack)
बीएमसीकडून गेल्या तीन वर्षात मुंबईकरांच्या विकासासाठीच्या निधीचं सर्व प्रभागांत समान वाटप होणं अपेक्षित आहे. मात्र केवळ राजकीय स्वार्थापोटी विरोधी पक्षाचे आमदार-खासदार यांना निधीच न देणं म्हणजे निधी वाटपातील हे निव्वळ राजकारण असून, हा थेट त्या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार आणि नागरिकांवर अन्याय आहे, असल्याचे सागर देवरेंचं म्हणणं आहे.(Anil Parab Launches a Fierce Attack)
…तर ही गद्दारीची किंमत असल्याचा घणाघाती आरोप
विरोधी पक्षाचे आमदार-खासदार यांना निधी उपलब्ध न झाल्यामुळे कामे होत नाहीत, लोकांचा रोष वाढतो. मग अशा आमदार-खासदारांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या पक्षात येण्यासाठी दबाव टाकला जातो, असा आरोप सागर देवरे यांनी केलाय. तर ही गद्दारीची किंमत असल्याचा घणाघाती आरोप विधान परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाते आमदार अनिल परब यांनी केला.
पालकमंत्र्यांच्या शिफारशींनुसारच हा निधी वितरीत करण्यात आल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलंय. शिवसेना (शिंदे) आणि भाजपाच्या आमदार-खासदारांव्यतिरिक्त केवळ काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील आमदार अमीन पटेल (18.70 कोटी), समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (5 कोटी), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक (15 कोटी) आणि त्यांच्या कन्या आमदार सना मलिक यांना (17.50 कोटी) इतका निधी देण्यात आला.
बीएमसीकडून गेल्या तीन वर्षांत कोट्यवधींची खैरात
राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा यांना यंदा (12.50 कोटी) इतका निधी : तर माजी खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन आणि राहुल शेवाळे यांना वर्ष 2023-24 मध्ये प्रत्येकी (25 कोटी) रुपयांचा निधी देण्यात आला होता. तर उत्तर मुंबईतील विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना गेल्या दोन वर्षांत (32.50 कोटी), वायव्य-पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांना गेल्या दोन वर्षांत (29.07 कोटी) तर राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा यांना यंदा (12.50 कोटी) इतका निधी महापालिकेतर्फे देण्यात आला. (Anil Parab Launches a Fierce Attack)