Home » Blog » Lakshmi Mahavidyalaya : मध्यवर्ती युवा महोत्सवात शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचा बहारदार विजय

Lakshmi Mahavidyalaya : मध्यवर्ती युवा महोत्सवात शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचा बहारदार विजय

by प्रतिनिधी
0 comments
Lakshmi Mahavidyalaya

कोल्हापूर : प्रतिनिधी : एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई आयोजित मध्यवर्ती युवा महोत्सवात शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, तिटवेच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत बक्षिसांची लयलूट केली आहे. विविध साहित्यिक व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी आपले कौशल्य, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता यांचा देखणा संगम सादर करत महाविद्यालयाचा झेंडा विद्यापीठ स्तरावर दिमाखात फडकवला. (Lakshmi Mahavidyalaya)

   लिटरेचर इव्हेंट  चॅम्पियनशिपमध्ये विद्यार्थिनींनी आपली भाषिक जाण, विचारांची परिपक्वता आणि अभिव्यक्तीची धार दाखवत विजेतेपदे पटकावली. वक्तृत्व, निबंधलेखन, कविता सादरीकरण आणि वादविवाद या सर्व क्षेत्रांत त्यांनी प्रभावी छाप पाडली.

मराठी वक्तृत्व स्पर्धेत दुसरा तर इंग्रजीत तृतीय, तर हिंदी वादविवादात प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी विचारशक्ती आणि आत्मविश्वासाचा सुंदर मेळ घातला. निबंधलेखनात मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराती या चारही भाषांमध्ये पारितोषिके मिळवून महाविद्यालयाने भाषिक विविधतेतील एकतेचा आदर्श घालून दिला. (Lakshmi Mahavidyalaya)

सांघिक स्पर्धांमध्येही महाविद्यालयाने उत्तुंग कलात्मकता सादर केली. लोकनृत्याच्या रंगतदार सादरीकरणातून भारतीय लोकसंस्कृतीचा निखळ आनंद प्रकट झाला आणि त्यासाठी प्रथम पारितोषिक मिळाले. माईम व भारतीय समूहगीतात तृतीय पारितोषिक मिळवून विद्यार्थिनींनी भावनांची अभिव्यक्ती शब्दांशिवाय कशी करता येते याचे उदाहरण घालून दिले. स्किट सादरीकरणालाही उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

या यशामागे विद्यार्थिनींची मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि शहीद महाविद्यालयाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील, मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील, तसेच प्राचार्य प्रा. प्रशांत पालकर,  शिक्षक  यांचे सहकार्य लाभले. (Lakshmi Mahavidyalaya)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00