Home » Blog » बोगस बहिणीने लाटले १६५ कोटी रुपये

बोगस बहिणीने लाटले १६५ कोटी रुपये

by प्रतिनिधी
0 comments
Unqualified sister embezzled Rs 165 crore

नागपूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे १६५ कोटी रुपये अपात्र बहिणींनी लाटल्याची धक्कादायक माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विधीमंडळात दिली. सुरवातीच्याकाळात छाननीशिवाय सरकारने सरसकट पैसे दिल्यामुळे ही गोष्ट घडल्याचे स्पष्ट झाले आहे. लाटलेले पैसे वसूल करण्यासाठी सरकार प्रक्रिया राबवणार असल्याचे मंत्री तटकरे यांनी सभागृहाला सांगितले. (Unqualified sister embezzled Rs 165 crore)

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजने संदर्भात तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. या योजनेचे २६ लाख बोगस लाभार्थी असून सुमारे ५ हजार १३६ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावरून आमदार सर्वश्री प्रज्ञा सातव, अशोक जगताप, सतेज पाटील, निरंजन डावखरे आणि प्रवीण दरेकर यांच्यासह आणखी काही सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मंत्री आदिती तटकरे यांनी लेखी उत्तर दिले आहे. (Unqualified sister embezzled Rs 165 crore)

महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी १६५ कोटी रुपये कुणी लाटले याची आकडेवारी सभागृहात सादर केली. यात १२हजार ४३१ पुरुषांनी २५ कोटी रुपये, ७७ हजार अपात्र बहिणींनी १४० कोटी रुपये आणि ९ हजार ५२६ सरकारी सेवेतील महिला कर्मचाऱ्यांनी सुमारे १४.५ कोटी रुपये लाटल्याची माहिती दिली. (Unqualified sister embezzled Rs 165 crore)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00