Home » Blog » आठ कोटीची भिशी थकल्याने भाजप सरचिटणीसाचा आत्महत्येचा प्रयत्न

आठ कोटीची भिशी थकल्याने भाजप सरचिटणीसाचा आत्महत्येचा प्रयत्न

by प्रतिनिधी
0 comments
BJP General Secretary attempts suicide

कोल्हापूर : प्रतिनिधी : खासगी भिशीतील गुंतवणूकदारांचे आठ कोटी रुपये देण्याचे थकल्याने कोल्हापूर जिल्हा सरचिटणीसाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. ऐन महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना भाजप पदाधिकाऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याने पक्षाला फटका बसण्याची भिती फुलेवाडी परिसरात व्यक्त केली जात आहे. या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीची तयारीही केली होती अशी माहिती पुढे आली आहे. सध्या त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. (BJP General Secretary attempts suicide)

फुलेवाडी परिसरातून मिळालेल्या माहितीनुसार फुलेवाडीतील प्रमिलाराजे खानविलकर सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून खासगी भिशी चालण्यात येत आहे. या भिशीत गुंतवणूकदारांचे आठ कोटी रुपये अडकले आहेत. भाजप जिल्हा सरचिटणीस राजू मोरे यांनी भिशीतील तीन ते चार कोटी रक्कम सीमाभाग, कर्नाटकासह शहरात गुंतवली होती. पण त्याची परतफेड करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यातच भिशीमध्ये २४ टक्के व्याजदराने पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांनी मोरे यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला होता. गुंतवणूकदारांचे पैसे देण्यासाठी मोरे यांनी स्वत:ची जमीनही विक्रीस काढली होती. या जमिनीचा व्यवहार होणार होता. पण तो व्यवहार झाला नाही. बुधवारी रात्री फुलेवाडी परिसरातील गुंतवणूकदारांनी मोरे यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती असे कळते. तगाद्याच्या भितीने गुरुवारी पहाटे विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रकृतीसंबधी उलट सुलट बातम्यांनी गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळते. (BJP General Secretary attempts suicide)

राजू मोरे फुलेवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ओळखले जातात. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन फुलेवाडी परिसरात चांगली बांधणी केली आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात २०२४ च्या निवडणुकीत पक्षाचा प्रचार जोमाने केला होता. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार तयारी केली होती. पण त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (BJP General Secretary attempts suicide)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00