Home » Blog » Unnati Hooda : उन्नती, आयुषची उपांत्य फेरीत धडक

Unnati Hooda : उन्नती, आयुषची उपांत्य फेरीत धडक

तैपेई ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला व पुरुष एकेरीत आगेकूच

0 comments
Unnati Hooda

तैपेई : भारताच्या उन्नती हुडा आणि आयुष शेट्टी या युवा बॅडमिंटनपटूंनी तैपेई ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. आयुषने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत कॅनडाच्या ब्रायन यँगला पराभूत केले. उन्नतीने महिला एकेरीत तैपेईच्या यी-तिंग हंगविरुद्धचा उपांत्यपूर्व सामना जिंकला. (Unnati Hooda)

आयुष जागतिक क्रमवारीत ४४ व्या स्थानावर आहे. या स्पर्धेमध्ये आयुषने भारताच्याच किदाम्बी श्रीकांतला हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. उपांत्यपूर्व सामन्यात त्याने सातव्या मानांकित ब्रायनला सुमारे सव्वा तास रंगलेल्या लढतीत १६-२१, २१-१९, २१-१४ असे पराभूत केले. या सामन्यात पहिला गेम गमावल्यानंतर आयुषने जोरदार पुनरागमन केले. दुसऱ्या गेममध्ये मोक्याच्या क्षणी आघाडी घेऊन आयुषने हा गेम २१-१९ असा जिंकला आणि सामन्यात बरोबरी साधली. अखेरच्या निर्णायक गेमममध्ये आयुषने नेटजवळ प्रभावी खेळ केला. हा गेम २१-१४ असा जिंकून आयुषने विजय निश्चित केला. उपांत्य फेरीत त्याचा सामना तैपेईच्या अग्रमानांकित तियान चेन चोऊ याच्याशी होईल. (Unnati Hooda)

महिला एकेरीत उन्नतीने यी-तिंगला २१-८, १९-२१, २१-१९ असे पराभूत केले. ही लढत ५२ मिनिटे रंगली. उपांत्यपूर्व सामन्यातील पहिला गेम २१-८ असा सहज जिंकल्यानंतर पुढील दोन सेटमध्ये उन्नतीला कडव्या प्रतिकाराचा सामना करावा लागला. परंतु, अखेर उन्नतीने यी-तिंगचे आव्हान मोडून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत उन्नतीसमोर जपानच्या अग्रमानांकित तोमोका मियाझाकीचे आव्हान आहे. (Unnati Hooda)

हेही वाचा :
आयपीएल एक आठवडा स्थगित


You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00