Home » Blog » Girl Gang-raped: मुख्याध्यापकांच्या कार्यालयात सामूहिक बलात्कार

Girl Gang-raped: मुख्याध्यापकांच्या कार्यालयात सामूहिक बलात्कार

व्हिडिओ बनवून हत्येची धमकी; उत्तर प्रदेशातील घटना

by प्रतिनिधी
0 comments
Girl Gang-raped

बरेली : मुरादाबादमधील एका पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकांच्या कार्यालयात पाच शाळकरी मुलांनी एका १२ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. ८ मे रोजी ही घटना घडली. (Girl Gang-raped)

या सर्व अल्पवयीनांनी या घटनेचे चित्रीकरण केले. घटनेची वाच्यता केल्यास पालकांना जीवे मारण्याची धमकी दिली. बलात्काराचा व्हिडिओही त्यांनी व्हायरल केला. पीडितेच्या आईला हा धक्कादायक प्रकार समजल्यानंतर तिने एफआयआर दाखल केला. मंगळवारी (२१ मे) संध्याकाळी पाचही आरोपींना अटक करण्यात आली.

आरोपी१२ ते १५ वयोगटातील आहेत. ते मुलीचे शेजारी होते आणि सिव्हिल लाईन पोलिस स्टेशन हद्दीतील त्याच शाळेत शिकत होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुलगी दुसऱ्या शाळेत शिकते. तिने भीतीपोटी सुरुवातीला याची वाच्यता केली नव्हती.(Girl Gang-raped)

सोमवारी रात्री शेजाऱ्याने व्हिडिओ दाखवल्यानंतर मुलीच्या आईला घटनेची माहिती मिळाली. घटनेनंतर मुलगी नैराश्यात होती. तिने मुलीला वारंवार काय झाले, असे विचारले, पण व्हिडिओ समोर येईपर्यंत ती मुलगी गप्प राहिली. त्यानंतर तिने धाय मोकलून रडत घडलेला प्रसंग सांगितला, असे तिच्या आईने पोलिसांना सांगितले.(Girl Gang-raped)

८ मे रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी तिच्या घराबाहेर खेळत होती. यावेळी या पाच मुलांनी तिच्याकडे येऊन तिला काहीतरी आमीष दाखवले आणि जवळच्या ज्युनियर हायस्कूलमध्ये नेले.

त्यातील एका मुलाचे वडील या शाळेत चौकीदार आहेत. त्याने घरात ठेवलेली शाळेची चावी आणली होती. ते शाळेत आल्यानंतर मुलांनी मुख्य गेट बंद केले आणि तिला मुख्याध्यापकांच्या कार्यालयात नेले.

तिथे त्यांनी तिला ड्रग्ज मिसळलेले सॉफ्ट ड्रिंक दिले. ती बेशुद्ध पडल्यानंतर त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि मोबाईल फोनवर रेकॉर्ड केले. या घटनेची वाच्यता केली तर तिच्या पालकांना मारण्याची तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

एसएसपी सतपाल अंतिल यांनी सांगितले की, “याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00