हांगझोऊ : ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपिचंद या भारताच्या जोडीला बुधवारी वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पराभव पत्करावा लागला. महिला दुहेरीत पहिल्या फेरीमध्ये लिऊ शेंग शू-तान निंग या चीनच्या अग्रमानांकित जोडीने त्यांना २०-२२, २२-२०, २१-१४ असे पराभूत केले. (World Tour Badminton)
या सामन्यातील पहिला गेम जिंकून ट्रिसा-गायत्री जोडीने आश्वासक सुरुवात केली होती. दुसऱ्या गेममध्येही त्यांनी चीनच्या प्रतिस्पर्ध्यांना चुरशीची लढत दिली. तिसऱ्या गेममध्ये मात्र ट्रिसा-गायत्री यांचा प्रतिकार तोकडा पडला. लिऊ-तान जोडीने हा सामना ८१ मिनिटांत जिंकला. या वर्षीच्या वर्ल्ड टूर स्पर्धेमध्ये खेळणारी ट्रिसा-गायत्री ही एकमेव भारतीय जोडी आहे. पुढच्या फेरीत त्यांच्यासमोर मलेशियाच्या टॅन पर्ली-थिनाह मुरलीधरन या जोडीचे आव्हान आहे. (World Tour Badminton)
हेही वाचा :