Home » Blog » कोल्हापूर महापौरपदी बाजी कोण मारणार?

कोल्हापूर महापौरपदी बाजी कोण मारणार?

by प्रतिनिधी
0 comments
Who will get the opportunity to become the mayor in Kolhapur

कोल्हापूर : प्रतिनिधी : प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता आल्याने महापौरपदाची संधी भाजपला की शिवसेनेला मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. महापौरपद ओबीसीसाठी आरक्षित झाले आहे.  महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा भाऊ असून त्यांचे सर्वाधीक संख्याबळ आहे. तर शिवसेनेनेही महापौरपदाची इच्छा व्यक्त केली असल्याने नेते मंडळी कोणाच्या पदरात दान टाकणार यावर महापौरपद निश्चित होणार आहे.

महानगरपालिकेत ८१ सदस्य संख्या असून भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीला ४५ जागा मिळाल्या आहेत. भाजपचे सर्वाधीक नगरसेवक असून त्या खालोखाल शिवसेनेचे नगरसेवक आहेत. शिवसेनेच्या इतिहासात प्रथम कोल्हापूर महानगरपालिकेत शिवसेनेने दोन अंकी संख्या गाठली आहे. महानगरपालिकेवर भगवा फडकावण्यासाठी भाजप आणि शिवसेना इच्छुक असून त्यासाठी नेतेमंडळींनी प्रयत्न सुरू केले आहेत. (Who will get the opportunity to become the mayor in Kolhapur?)

महापौरपद ओबीसीसाठी आरक्षित झाले असून भाजपकडून विशाल शिराळे, विजयसिंह देसाई, प्रदीप देसाई, वैभव कुंभार, रेखा उगवे, सुरेखा ओटावकर हे सहा नगरसेवक ओबीसीतून विजयी झाले आहेत. भाजपच्या रुपाराणी निकम आणि विजयसिंह खाडे पाटील हे सर्वसाधारण प्रभागातून विजयी झाले असून त्याच्याकडे ओबीसीचा दाखला आहे. त्यांची नावे महापौरपदाच्या शर्यतीत पुढे आली आहेत. (Who will get the opportunity to become the mayor in Kolhapur?)

विशाल शिराळे यांचे वडील किरण शिराळे हे माजी नगरसेवक आहेत. ते दोन वेळा निवडून आले आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांचे समर्थक आहेत. किरण शिराळे यांना महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपदाशिवाय कोणतेच पद दहा वर्षात मिळाले नाही. विरोधात असल्याने त्यांना निधीसाठी झगडावे लागले पण त्यांनी भाजप नेत्यांकडून निधी मिळवत प्रभागात विकास कामे केली. गेल्या पंधरा वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत त्यांनी भाजप शिवसेना युतीचा हिरीरीने प्रचार केला आहे. विशाल शिराळे हे भाजप पक्षातून केंद्रप्रमुखापासून कार्यरत आहेत. महाडिक काका पुतण्याकडून त्यांच्या नावाचा आग्रह होण्याच् शक्यता वर्तवली जात आहे. विजयसिंह देसाई आणि प्रदीप देसाई, वैभव हे दोघेही नवीन आहेत. (Who will get the opportunity to become the mayor in Kolhapur?)

रुपाराणी निकम यांनी गेल्या सभागृहात भाजपकडून प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांच्या नावाचा विचार करताना ओबीसी प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. विजयसिंह खाडे पाटील हे माजी नगरसेवक आहेत. तसेच मुळ भाजपचे असून निष्ठावंत आहेत. निष्ठावंताकडून त्यांच्या नावाचा आग्रह होऊ शकतो. तसेच ते मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते आहेत. महापौर निवडीत चंद्रकांत पाटील, महादेवराव महाडिक यांचा शब्द ज्याच्या पारड्यात पडेल त्याला महापौरपदाची संधी मिळणार आहे.

शिवसेनेनेही महापौरपद मिळावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्याकडे अजित इंगवले, अश्कीन आजरेकर हे ओबीसीतून विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीतून अदिल फरास हे सर्वसाधारण प्रभागातून विजयी झाले असले तरी त्यांच्याकडेही ओबीसीचा दाखला आहे. महापौरपद सलग अडीच वर्ष देणार की अडीच वर्षे वाटून घेणार याचा निर्णय नेतेमंडळींना घ्यावा लागणार असे. जर महापौरपद वाटून घेतले तर शिवसेना आणि राष्ट्रवादीची पुढील काळात लॉटरी लागू शकते. (Who will get the opportunity to become the mayor in Kolhapur?)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00