Home » Blog » Three Jawans killed: भूस्खलनात तीन जवानांचा मृत्यू

Three Jawans killed: भूस्खलनात तीन जवानांचा मृत्यू

by प्रतिनिधी
0 comments
Three Jawans killed

सिलीगुडी : उत्तर सिक्कीममधील चाट्टेन येथे रविवारी रात्री उशिरा झालेल्या भूस्खलनात लष्कराच्या तीन जवानांच्या मृत्यू झाला. नऊ जण बेपत्ता आहेत. दरम्यान, ३० मे पासून लाचुंगमध्ये अडकलेल्या १,६०० पर्यटकांना सोमवारी सकाळी वाचवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Three Jawans killed)

“लाचेन नदीतील पाण्याची पातळी वाढल्यानंतर चाट्टेन येथील लष्करी छावणीला भूस्खलनाचा धक्का बसला. लष्कराच्या तीन जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि नऊ जवान बेपत्ता आहेत. लष्कराचे शोधकार्य सुरू आहे,” असे मंगन जिल्ह्यातील चुंगथांगचे उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण थटल यांनी सांगितले.

गेल्या गुरुवारी, उत्तर सिक्कीममध्ये आठ पर्यटकांसह नऊ जण बेपत्ता झाले होते. ते प्रवास करत असलेले वाहन तीस्ता नदीत कोसळले होते. त्या सर्वांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. (Three Jawans killed)

लाचेनपासून सुमारे ३ किमी अंतरावर असलेले चाट्टेन हे भूस्खलनामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहे. येथे अनेक लष्करी छावण्या आहेत.

सोमवारी लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “उत्तर सिक्कीममधील चाट्टेन येथे काल भूस्खलन झाले. त्यामुळे जवळच्या वस्तीचे नुकसान झाले. तीन मृतदेह सापडले आहेत. यात काही सैनिकांचा समावेश आहे. आणखी काही बेपत्ता असल्याचा संशय आहे. मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया आणि शोध मोहीम सुरू आहे,”

उत्तर सिक्कीममधील अनेक भाग अनेक भूस्खलनांमुळे तुटलेले आहेत. जीवितहानीच्या बातम्या सातत्याने येत आहेत. सोमवारी सकाळपासून उत्तर सिक्कीममधील लाचेनसारखी ठिकाणांचा सर्व बाजूंनी संपर्क तुटला आहे. लाचुंग येथे अडकलेल्या काही शेकडो पर्यटकांना बाहेर काढण्यात आले.

“सोमवारी लाचुंगमधून ३८० मुलांसह सुमारे १,६०० पर्यटकांना वाचवण्यात आले. मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना सातत्याने होत असल्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली. त्यामुळे हे पर्यटक ३० मे पासून अडकले होते. रविवारी रात्री ढिगारा साफ करण्यात आला. सोमवारी सकाळी बचाव कार्य सुरू झाले. लाचेनमध्ये अजूनही सुमारे १५० पर्यटक अडकले आहेत. ते सुरक्षित आहेत आणि हॉटेलमध्ये आहेत. एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) देखील तेथे आहे,” असे मंगनचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (Three Jawans killed) लाचेन आणि लाचुंग ही दोन्ही ठिकाणे २,७०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर वसलेली आहेत. उत्तर सिक्कीममधील गुरुडोंगमार तलाव आणि युमथांग व्हॅली यासारख्या उंचावरील ठिकाणी जाणारे पर्यटक लाचेन आणि लाचुंग येथे थांबतात.

हेही वाचा :
पुणे न्यायालयाने राहुल गांधींची याचिका फेटाळली
मनपा, जिल्हा परिषद निवडणूकीसाठी प्रभाग रचना करा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00