Home » Blog » IDBI Strike: ‘आयडीबीआय’ खाजगीकरणाविरोधातील संप यशस्वी

IDBI Strike: ‘आयडीबीआय’ खाजगीकरणाविरोधातील संप यशस्वी

by प्रतिनिधी
0 comments
IDBI Strike

मुंबई : आयडीबीआय बँकेच्या होऊ घातलेल्या खाजगीकरणाविरोधात बँकेचे कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी सोमवारी (११ ऑगस्ट) लाक्षणिक संप पुकारला. हा संप देशव्यापी संप यशस्वी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. या संपात आयडीबीआय बँकेतील वरिष्ठ कार्यपालक वगळता कंत्राटी कर्मचारी, सर्व कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते. (IDBI Strike)

आयडीबीआय बँकेची खाजगीकरण प्रक्रिया आता अखेरच्या टप्प्यात आहे. आयडीबीआय ही देशातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँका असेल, जिचे खाजगीकरण करण्यात येत आहे. असे झाल्यास भारतातील खाजगी बँकांचा इतिहास पाहिला तर जसे की ग्लोबल ट्रस्ट बँक, कराड बँक, येस (YES) बँक पीएमसी बँकेमध्ये सामान्य माणसाने घाम गाळून जमा केलेल्या ठेवी जशा असुरक्षित बनल्या तसेच होण्याचा धोका आहे. पर्यायाने सामान्य माणूस बँकिंगच्या वर्तुळाबाहेर फेकला जाईल. हे लक्षात घेता संघटनांनी आयडीबीआय बँकेचा मालकी हक्क खाजगी तसेच विदेशी भांडवलदाराकडे सुपूर्द करू नये, असे आवाहन संपकरी कर्मचाऱ्यांनी यावेळी सरकारला केले. (IDBI Strike)

मुंबई येथे आयडीबीआय बँकेच्या मुख्यालयासमोर झालेल्या निदर्शनावेळी युनायटेड फोरम ऑफ आयडीबीआय ऑफिसर अँड एम्प्लॉईज यांचे निमंत्रक कॉ. देवीदास तुळजापूरकर यांनी असे सांगितले की, आयडीबीआय बँकेचे खाजगीकरण हा आंतरराष्ट्रीय वित्त भांडवलाचा भारतीय बँकिंग वरील हल्ला आहे, आणि हा प्रयोग यशस्वी झाला तर इतरही भारतीय बँकांच्या बाबतीत हेच घडण्याची शक्यता आहे. भारतीय बँकिंगचे अस्तित्व आणि सार्वभौमत्व यामुळे धोक्यात येणार आहे, हे लक्षात घेता पूर्ण ताकदीनिशी आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणाला आपण तीव्र विरोध केला पाहिजे. (IDBI Strike)

सरकारने आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरनाबाबत फेरविचार केला नाही तर यूनायटेड फोरम सर्व संघटनांना सहभागी करून घेऊन हे आंदोलन अधिक तीव्र करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

बँकिंग उद्योगातील एआयबीओए (AIBOA), एआयबीओसी (AIBOC), बेफि (BEFI) यांनी या संपाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे यावेळी आभार व्यक्त केले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00