Home » Blog » Anna University Case: विद्यार्थिनीवर अत्याचार; आरोपीला जन्मठेप

Anna University Case: विद्यार्थिनीवर अत्याचार; आरोपीला जन्मठेप

by प्रतिनिधी
0 comments
Anna University Case

चेन्नई : येथील अण्णा विद्यापीठातील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला ३० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.  सोमवारी (२ जून) चेन्नईतील महिला न्यायालयाने दोषी ज्ञानशेखर (३७) याला ३० वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या शिक्षेत त्याला कसलीही माफी दिली नाही. (Anna University Case)

गेल्या आठवड्यात न्यायालयाने ज्ञानसेकरला भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ६४(१) (बलात्कार) सह ११ तरतुदींनुसार दोषी ठरवले.

गेल्या आठवड्यात न्यायालयाने त्याला भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम ६४(१) (बलात्कार) सह ११ तरतुदींखाली दोषी ठरवले. न्यायालयाने सोमवारी शिक्षा सुनावणार असल्याचे सांगितले होते. (Anna University Case)

त्यानुसार सोमवारी, कडक बंदोबस्तात, ज्ञानसेखरला पुझल येथील मध्यवर्ती कारागृहातून पोलिस व्हॅनमधून न्यायालयाच्या आवारात आणण्यात आले. त्याला ट्रायल कोर्ट (महिला कोर्ट) न्यायाधीश एम. राजलक्ष्मी यांच्यासमोर हजर करण्यात आले.

“बीएनएसच्या कलम ६४(१) अंतर्गत, तुम्हाला किमान ३० वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ज्यामध्ये कोणतीही माफी नाही. तसेच, या कलमाअंतर्गत २५,००० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. दंड न भरल्यास तुम्हाला तीन महिने साधी कैद भोगावी लागेल,” असे न्यायाधीश राजलक्ष्मी यांनी सुनावले.

न्यायालयाने या प्रकरणात ज्ञानशेखरला दोषी ठरवताना एक महिन्यापासून ते १० वर्षांपर्यंतच्या वेगवेगळ्या शिक्षा सुनावल्या. बीएनएस, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि तमिळनाडू महिला छळ प्रतिबंधक कायद्याच्या आणखी १० कलमांखाली अधिक दंडाची शिक्षाही सुनावली. या सर्व शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत. ज्ञानसेकरला एकूण ९०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (Anna University Case)

तसेच न्यायाधीशांनी राज्य सरकारने या प्रकरणात पीडितेला भरपाई देण्याचे आदेशही दिले.

प्रकरण काय?

ही घटना २३ डिसेंबर २०२४ रोजी घडली होती. पीडित १९ वर्षीय विद्यार्थिनी आणि तिची मैत्रीण अण्णा विद्यापीठाच्या कॅम्पसबाहेर होत्या. त्यावेळी बिर्याणी दुकान चालवणारा ज्ञानसेखर संध्याकाळी कॅम्पसमध्ये घुसला. त्याने दोघींना ब्लॅकमेल केले आणि एका निर्जन ठिकाणी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला. आरोपपत्रानुसार, त्याने आपल्या फोनवर या कृत्याचे व्हिडिओ चित्रीकरण देखील केले. यासंबंधीच्या बातम्या आल्यानंतर प्रचंड संताप निर्माण झाला होता. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली. या पथकाने केलेल्या चौकशीनुसार सराईत ज्ञानसेखर यानेच हे कृत्य केल्याचे सिद्ध झाले. त्यात तो एकमेव आरोपी ठरला होता.

हेही वाचा :
भूस्खलनात तीन जवानांचा मृत्यू
मनपा, जिल्हा परिषद निवडणूकीसाठी प्रभाग रचना करा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00