Home » Blog » ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे निधन

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे निधन

by प्रतिनिधी
0 comments
Senior sculptor Ram Sutar has passed away

नवी दिल्ली : महाराष्ट्र भूषण प्राप्त जागतिक किर्तीचे शिल्पकार राम सुतार (वय १००) यांचे बुधवारी मध्यरात्री निधन झाले. उत्तर प्रदेशातील नोएडातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९ फेब्रुवारीला ते वयाची १०१ वर्षे पूर्ण करणार होते. शिल्पकलेतील एक चालता बोलता इतिहास निघून गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. (Senior sculptor Ram Sutar has passed away)

 गेल्या ६० वर्षात त्यांनी दोनशेहून अधिक भव्य शिल्प, पुतळ्यांची निर्मिती केली. वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी युनिटीच्या भव्य पुतळ्याची उभारणी राम सुतार यांनी केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत यांच्यासह दिग्गज नेत्यांचे पुतळे राम सुतार यांनी साकारले होते. मुंबईतील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे कामही राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते. तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. (Senior sculptor Ram Sutar has passed away)

राम सुतार यांच्या जन्म धुळे जिल्हयातील गोंदूर या गावी १९२५ मध्ये झाला. राम सुतार यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. जेजेमध्ये त्यांच्या प्रतिभेला वाव मिळाला. दगड आणि संगमरवरी शिल्पकलेवर प्रभुत्व मिळवता आल्यामुळे चित्रकला आणि मातीकाम शिकवणाऱ्या शिक्षकांबद्दल त्यांनी कायम कृतज्ञता बाळगली. राम सुतार यांना धातुच्या ओतकामाची आवड होती. या आवडीतून त्यांनी भव्य दिव्य पुतळ्यांची निर्मिती केली. राम सुतार यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे घडवले. संसदेतील महात्मा गांधीचा कास्य आणि पाषाणातील पुतळा त्यांनी बनवला आहे. त्यांनी महात्मा गांधींचे असंख्य पुतळे घडवले आहेत. (Senior sculptor Ram Sutar has passed away)

२०१४ मध्ये शिल्पकलेतील योगदानाबद्दल महाराष्ट्र भूषण प्रदान करण्यात आला. १५ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम सुतार यांच्या नोएडा येथील घरी जाऊन हा पुरस्कार प्रदान केले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00