Home » Blog » Gold rate : सोन्याच्या दरात चार हजारांची घसरण

Gold rate : सोन्याच्या दरात चार हजारांची घसरण

अक्षय तृतीयेला हलके दागिने खरेदीवर भर

by प्रतिनिधी
0 comments
Gold rate

मुंबई : प्रतिनिधी : सोन्याच्या उच्चांकी दरानंतर आज मंगळवारी सोन्याच्या दरात प्रतितोळा चार हजार रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचा प्रति दहा ग्रॅम दर ९५ हजार ३१६ रुपयांवर आला आहे. सोन्याचा दर चार हजाराने कमी झाला असला तरी हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने अक्षय तृतीयेला हलके दागिने खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असणार आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Gold rate)

अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यानंतर आणि अमेरिकेच्या बदलत्या धोरणामुळे सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचा दर ९९ हजार ३५८ रुपये होता. पण मंगळवारी सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅममध्ये चार हजार रुपयांची घसरण झाल्याने ग्राहकांनी काहीकाळ सुटकेचा निश्वास सोडला आहे. (Gold rate)

सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे सराफ बाजार थंड पडला आहे. अक्षय तृतीयेला मोठी सोन्याची खरेदी होते. पण सोने जवळपास एक लाखाच्या आसपास पोचल्याने सराफ बाजारात चिंता व्यक्त केली जात होती. पण मंगळवारी सोन्याच्या प्रति दहा ग्रॅममध्ये चार हजार रुपयांची घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. तरीही सोन्याचा दर अनेकांच्या आवाक्याच्या बाहेर असल्याने अक्षय तृतीयेला जड दागिन्यांपेक्षा हलके दागिने आणि नाणी खरेदीवर ग्राहकांचा कल असण्याची शक्यता आहे. (Gold rate)

हेही वाचा :

संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00