Home » Blog » लग्नाच्या नावाखाली मुलीला दोन लाखांना विकले

लग्नाच्या नावाखाली मुलीला दोन लाखांना विकले

लग्नाच्या नावाखाली मुलीला दोन लाखांना विकले

by प्रतिनिधी
0 comments
Crime file photo

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या नावाखाली १७ वर्षांच्या मुलीला १.८० लाख रुपयांना विकण्यात आले. या प्रकरणी मुलीची आई आणि पतीसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त (डीसीपी) हृषिकेश मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने लग्नाच्या नावाखाली आपल्या मुलीला १.८० लाख रुपयांना विकले. मुलीला गुजरातला पाठवण्याची योजना आखण्यात आली. मुलीने पोलिसांना सांगितले, की गुजरातमध्ये पोहोचल्यावर तिला दोन दिवस गोदामात कोंडून ठेवले होते. या वेळी नराधमाने मुलीवर बलात्कार केला. मुलगी कशी तरी त्याच्या तावडीतून सुटून इंदूरला परतण्यात यशस्वी झाली. (Indore)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00