Home » Blog » राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत अजित पवार, मुश्रीफ यांच्यासह वळसेंचा समावेश

राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत अजित पवार, मुश्रीफ यांच्यासह वळसेंचा समावेश

९ मंत्र्यांसह, उपाध्यक्ष व विद्यमान ३२ आमदारांचा समावेश

by प्रतिनिधी
0 comments
ajit pawar file photo

मुंबई;  विशेष प्रतिनिधी : सत्तारूढ महायुतीतील भाजपा व शिवसेना शिंदे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केल्यानंतर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बुधवारी ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह आठ मंत्री, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह विद्यमान ३२ आमदारांचा त्यात समावेश आहे.

प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. दुसरी यादी गुरूवारी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उमेदवारांची नावे अशी :  अजित पवार (बारामती), छगन भुजबळ (येवला), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), हसन मुश्रीफ (कागल), धनंजय मुंडे (परळी), नरहरी झिरवाळ (दिंडोरी), धर्मराव बाबा आत्राम (अहेरी), अदिती तटकरे (श्रीवर्धन), अनिल पाटील (अंमळनेर), संजय बनसोडे (उदगीर) राजकुमार बडोले (अर्जुनी मोरगाव), प्रकाश सोळंके  (माजलगाव), मकरंद पाटील (वाई), माणिकराव कोकाटे (सिन्नर), दिलीप मोहिते (खेड आळंदी), संग्राम जगताप (अहमदनगर शहर), दत्तात्रय भरणे (इंदापूर), बाबासाहेब पाटील (अहमदपूर), दौलत दरोडा (शहापूर), अण्णा बनसोडे (पिंपरी), नितीन पवार (कळवण), आशुतोष काळे (कोपरगाव), किरण लहामटे (अकोले), चंद्रकांत उर्फ राजू नवघरे (बसमत), शेखर निकम (चिपळूण), सुनील शेळके (मावळ), अतुल बेनके (जुन्नर), यशवंत माने (मोहोळ), चेतन तुपे (हडपसर), सरोज आहिरे (देवळाली), राजेश पाटील( चंदगड), हिरामण खोसकर (इगतपुरी),राजू कारेमोरे (तुमसर), इंद्रनील नाईक (पुसद), सुलभा खोडके (अमरावती शहर), भरत गावित (नवापूर), निर्मला  विटेकर (पाथरी) आणि नजीब मुल्ला ( मुंब्रा-कळवा).

मलिक बापलेक ,झिशान सिद्दिकी वेटिंगवर

अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, त्यांची कन्या सना मलिक तसेच काँग्रेसमधून पक्षात आलेले विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांचा समावेश नाही. त्यांचे तिकीट निश्चित असले तरीही त्यांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

प्रवेशानंतर लगेचच उमेदवारी

भाजपचे नेते राजकुमार बडोले यांनी अजित पवार गटात मंगळवारी प्रवेश केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. अर्जुनी मोरगावमधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आजच पक्षात आलेल्या  काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके व हिरामण खोसकर यांनाही स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00