जमीर काझी : मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली नाही, हा थोडा दिलासा असला तरी या निवडणुकांचा निकाल हा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे. त्यामुळे ओबीसींच्या जागांवर असलेली टांगती तलवार कायम राहणार आहे. आज न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने ओबीसी समाजाला दिलासा नाहीच,अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. (Vadettiwar’s criticism of BJP)
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत चंद्रपूर येथे प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की,’ न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देताना, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याचा अर्थ, ज्या ठिकाणी ओबीसी आरक्षणामुळे एकूण आरक्षण टक्के च्या वर गेले आहे, त्या जागांवर निवडणूक होऊ शकणार नाही. त्यामुळे भाजपाने ओबीसी आरक्षणासंदर्भातील केलेलं सगळे दावे पूर्णपणे फोल ठरले आहेत. ही सपशेल बनवाबनवी आहे, अशी टीका केली. (Vadettiwar’s criticism of BJP)
ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तरी ओबीसी जागांचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहणार आहे. याचा स्पष्ट अर्थ आहे की, ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या छायेखाली राहणार आहे. भाजप सरकार सातत्याने आम्ही ओबीसींना २७% आरक्षण दिले म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत होते. मात्र, आजच्या परिस्थितीमुळे हे सर्व दावे फोल ठरले आहेत. ओबीसींसाठी दिलेले २७% आरक्षण गेले कुठे? याचे उत्तर भाजपने द्यावे. निवडणुका घेण्यास सांगूनही निकाल न्यायालयावर अवलंबून ठेवणे म्हणजे ओबीसी बांधवांची राजकीय दिशाभूल करणे आहे. भाजपने केवळ घोषणांची बनवाबनवी करून ओबीसी बांधवांना मूर्ख बनवले, अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली. (Vadettiwar’s criticism of BJP)