नवी दिल्ली : प्रतिनिधी : तब्बल सात गुणांची पिछाडी गुण भरुन काढत विजयी एक गुण वसूल करत भारतीय मल्ल सुजीत कालकलने अशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये ६५ किलो गटात सुवर्णपदक खेचून आणले. या स्पर्धेत भारताला त्याने कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदकाची हॅटट्रीक आणि ४४ वर्षानंतर हॉकीमध्ये महिला संघाने पटकावले सुवर्णपदकाने आजचा दिवस भारतीय खेळाडूंनी चांगलाच गाजवला. (Sujit Kalkal won the gold medal in wrestling)
नागोवा सिटी इनए स्पोर्टस् सेंटरमध्ये नाट्यमय अंतिम फेरीत भारताच्या सुजीत कालकलने ताजिकिस्तानच्या अब्दुलमाझिद कुदियेचा १०-९ असा पराभव केला. या लढतील सुजीत २-९ ने मागे होता. पण अखेराच्या क्षणी सलग आठ गुण पटकावत सुवर्णपदक जिंकले. (Sujit Kalkal won the gold medal in wrestling)
सुजितने अंतिम सामन्यात जोरदार सुरुवात करत ९-२ अशी घसघशीत आघाडी घेतली. ताजिक पैलवान सुवर्णपदक जिंकण्याच्या अगदी जवळ आला असताना सुजीतने हार न मानता शेवटच्या क्षणी सलग आठ गुण मिळवून पिछाडी भरुन काढली. अशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी सुजितने अफगाणिस्तान, इराण आणि जपानच्या मल्लांना पराभूत अंतिम फेरीत धडक मारली होती. (Sujit Kalkal won the gold medal in wrestling)