विलास अध्यापक : बेळगाव : कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानावरील ईडीची धाड अखेर सदतीस तासानंतर संपली. त्यांच्या गोकाक येथील निवासस्थानातून तीन कोटीची रोकड तर त्यांच्या मुलीच्या निवासस्थानातून एक कोटी तीस लाखाची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. अनेक कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. (ED action against Minister Jarkiholi)
धाडी संबंधी अधिकाऱ्यांनी दिल्लीला मुख्य कचेरीला अहवाल पाठवला असून ईडी अधिकारी पुढील आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत.आफ्रिका आणि रवांडा येथील गुंतवणुकी संदर्भात देखील ईडी अधिकाऱ्यांना कागदपत्रे मिळाली आहेत. इंडियन बँकेचे अधिकारी दोन मोठ्या पेट्या घेऊन गोकाक येथील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. (ED action against Minister Jarkiholi)
बुधवारी सकाळी मंत्री जारकीहोळी यांच्या बेळगाव, गोकाक, बंगलोर येथील निवासस्थानी ईडी अधिकाऱ्यांनी धाड घातली होती. तब्बल सदतीस तास ईडी अधिकारी शोधकार्यात आणि कागदपत्रे पडताळणीत गुंतले होते. रात्री देखील ईडी अधिकाऱ्यांची शोध मोहीम सुरूच होती. जारकीहोळी यांचे स्वीय सहाय्यक, त्यांचे भाऊजी आणि निकटवर्तीय यांच्या घरावर देखील धाडी टाकण्यात आल्या होत्या.
बेळगाव सह कर्नाटकात अनेक ठिकाणी जारकीहोळी समर्थकांनी रस्त्यावर उतरून ईडी धाडीचा निषेध केला होता. गुरुवारी ईडी अधिकारी धाड संपवून बाहेर पडल्यावर जारकीहोळी समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी जावून जल्लोष केला. ED action against Minister Jarkiholi)