नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या नीट-यूजी २०२५ परीक्षेची अंतिम उत्तर की आणि निकालाला आव्हान देणारी याचिका शुक्रवारी (४ जुलै) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. (NEET Result)
न्यायमूर्ती पीएस नरसिंह आणि आर महादेवन यांच्या खंडपीठाने उमेदवार शिवम गांधी रैना यांच्या याचिकेवर सुनावणी केली. एनटीएने एका प्रश्नाच्या (प्रश्न क्रमांक १३६, कोड क्रमांक ४७) उत्तरात चूक असल्याचा आरोप याचिकेत केला होता.
सुरुवातीला, खंडपीठाने सांगितले की त्यांनी बुधवारी असाच एक मुद्दा फेटाळून लावला होता. ‘‘परीक्षेच्या बाबतीत आम्ही हस्तक्षेप करणार नाही. तुम्ही कदाचित तत्त्वतः बरोबर असाल की अनेक बरोबर उत्तरे असू शकतात. तरीही, या टप्प्यावर अखिल भारतीय परीक्षेत हस्तक्षेप केल्याने गोंधळ निर्माण होईल,’’ असे न्यायमूर्ती नरसिंह यांनी याचिकाकर्त्यांचे वकील वरिष्ठ वकील आर बालसुब्रमण्यम यांना सांगितले. (NEET Result)
त्यावर याचिकाकर्त्याच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाने २०२४ च्या नीट-यूजी परीक्षेत हस्तक्षेप केला आणि आयआयटी-दिल्लीने दिलेल्या तज्ञांच्या अहवालाच्या आधारे चुका दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते, असे सांगितले. ‘‘विद्यार्थ्यांच्या करिअरवर परिणाम करणारी ही बाब आहे. एका गुणांच्या फरकही खूप मोठा असतो. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसतो,’’ असे बालसुब्रमण्यम यांनी सांगितले. तसेच त्यांनी या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी तज्ञ समिती स्थापन करण्याची विनंती केली. (NEET Result)
तथापि, राष्ट्रीय परीक्षेबाबतच्या वैयक्तिक प्रकरणात हस्तक्षेप करू शकत नाही असे सांगून खंडपीठाने आपली भूमिका बदलण्यास नकार दिला. न्यायमूर्ती नरसिंह म्हणाले की, २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेच्या प्रक्रियेतील विसंगती आणि त्रुटींबद्दल व्यापक तक्रारींमुळे हस्तक्षेप केला होता. (NEET Result)
याचिकेत केलेल्या दाव्यांनुसार, याचिकाकर्त्याने अखिल भारतीय रँक ६७८३ आणि सामान्य श्रेणी रँक ३१९५ मिळवला. जर चुकीचे उत्तर दुरुस्त केले गेले तर त्याला आणखी ५ गुण मिळतील. त्यामुळे त्याचा रँक सुधारेल.
हेही वाचा :
ठाकरे स्मारकांविरोधातील याचिका फेटाळल्या
‘सारथी’, ‘बार्टी’साठी समान धोरण : अजित पवार