नवी दिल्ली : प्रतिनिधी : मला भारतीय संघात परत यायला आवडेल, असे मत क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने व्यक्त केले आहे. सध्या आयपीएलमध्ये तो कोलकोता नाईट रायटर्स संघाचा कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी करत आहे. बीसीसीआयचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मत क्रिकेट जाणकाराकडून केले आहे. ३६ वर्षी रहाणे २०२३ मध्ये भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता. वैशिष्ट्य म्हणजे शेवटच्या सामन्यात त्याने भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवताना ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत गावसकर बॉर्डर मालिका २-१ ने खिशात घातली होती. (Rahane)
शुक्रवारी स्टार स्पोर्ट्सच्या पत्रकार कक्षात संवाद साधताना अजित रहाणेने सांगितले की “मला पुन्हा भारतीय संघात परत यायला आवडेल. माझी क्रिकेट खेळण्याची इच्छा, भूक, उत्साह अजूनही आहे. तंदुरुस्तीच्या बाबतीत, मी तिथेच आहे. मला फक्त एका वेळी एक सामना खेळायचा आहे, आत्ता या आयपीएलबद्दल विचार करत आहे आणि नंतर, भविष्यात काय होते ते पाहूया,” (Rahane)
“मी असा माणूस आहे जो कधीही हार मानत नाही. मी नेहमीच मैदानावर माझे सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो; १०० टक्क्यांहून अधिक देतो मी स्थानिक क्रिकेट खेळत आहे आणि सध्या मी खरोखरच माझ्या क्रिकेटचा आनंद घेत आहे,” असेही रहाणे म्हणाला. (Rahane)
रहाणेचा भारतीय संघातील सर्वात प्रसिद्ध अध्याय २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान आला. जिथे त्याने दुखापतींनी ग्रस्त असलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व करून ऐतिहासिक २-१ कसोटी मालिका जिंकली. रहाणेने उत्तम कामगिरी बजावूनही त्याला त्या मालिकेनंतर भारतीय संघातून बाजूला ठेवण्यात आले. (Rahane)
अजिंक्य रहाणे म्हणाला, “मी जेव्हा दररोज उठतो तेव्हा नेहमीच मी कोणती ध्येये साध्य करण्याची इच्छा मनात धरतो. माझ्यासाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा काहीही मोठे नाही. मला माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. मला पुन्हा ते भारतीय संघाचा किट परिधान करायचा आहे. ऑफ-सीझन मध्ये मी दिवसातून दोन-तीन सत्रांसाठी सराव करतो. मला वाटते की या क्षणी, माझ्यासाठी, स्वतःला खरोखर तंदुरुस्त ठेवणे खरोखर महत्वाचे आहे. (Rahane)

