नवी दिल्ली : पक्षांतरबंदी कायद्याचा ससेमिरा मागे लागू नये यासाठी तृणमुल काँग्रेसच्या वीस खासदाराच्या गटाने दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत सर्वात कमी प्रभाव पाडणाऱ्या नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया (एनसीपीआय) या पक्षात विलिन होण्याची घोषणा केली आहे. बंडखोर खासदारांनी लोकसभेत स्वतंत्र आसनव्यवस्थेची मागणी करत लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेतली. (Trinamool rebel MP to join NCPI)
दरम्यान तृणमुल संसदीय पक्षाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी अध्यक्षांना या फुटी गटाला कोणतीही मान्यता न देण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर तृणमुल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आह. पक्षाच्या ६० आमदारांनी वेगळा गट केला आहे. तर वीस खासदारांनीही ममता बॅनर्जी यांच्याविरोधात बंड केले आहे. हा गट भाजपमध्ये सामिल होण्याची चर्चा होती. पण पक्षांतरबंदी कायद्याची टांगती तलवार डोक्यावर राहू नये यासाठी वीस खासदारांनी त्रिपुरातील एनसीपीआय या अल्परिचित पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. हा गट एनडीएला पाठिंबा देणार आहे. हा पक्ष एनडीएमध्ये भाजपनंतर चौथा सर्वात मोठा पक्ष होणार आहे. (Trinamool rebel MP to join NCPI)
पक्षांतरबंदी कायद्यातून मार्ग काढण्यासाठी तृणमुलच्या वीस बंडखोरांनी विलिनीकरणाचा मार्ग निवडला आहे. एकाद्या पक्षाचे दोन तृतीयांश आमदार दुसऱ्या पक्षात सामील होतात तेव्हा विलिनीकरणास परवानगी मिळते. तृणमुलचे २८ खासदार असून वीस खासदारांनी या प्रस्तावा पाठिंबा दिल्याने ते एनसीपीआय पक्षात प्रवेश करणार आहेत.
२० बंडखोर खासदार असे
१. काकोली घोष दस्तीदार २. शताब्दी रॉय ३. बापी हलदार ४. शर्मिला सरकार ५. शर्मिला बंदोपाध्याय ६. जगदिश बर्मा बसुनिया ७. असित कुमार माल ८. अरूप चक्रवर्ती ९. रचना बॅनर्जी १०. सायोनी घोष ११. खलीलुर रहमान १२. अबू ताहेर खान १३. युसूफ पठाण १४. मिताली बॅग १५. माला रॉय १६. कालीपदा सोरेन १७. दीपक अधिकारी १८. जून मालिया १९. पार्थ भौमिक २०. सुदीप बंदोपाध्याय. (Trinamool rebel MP to join NCPI)