मुंबई : प्रतिनिधी : ‘बहीण भावामध्ये बोलणे झाले होते. ते आमच्यात आहे आणि ते वास्तव आहे’ असे भाष्य खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथमच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर केले. अजितदादाचं स्वप्न आम्ही साकार करु, असेही त्या म्हणाल्या. (Supriya Sule’s comment on NCP merger)
शरद पवारांची प्रकृती अतिशय चांगली असून कदाचित शुक्रवारी त्यांना डिसचार्ज मिळेल अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी माहिती दिली. त्यानंतर त्या अजित पवारांचा अपघाती मृत्यू, राष्ट्रवादीचे विलिनीकरणावर त्या बोलल्या. त्या म्हणाल्या. बहीण – भावामध्ये बोलणे झाले होते. ते आमच्यात आहे आणि ते वास्तव आहे. अनेकांना विलीनीकरणाबाबत बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. मात्र अनेकांना मी बोललेले आवडत नाही. पण आज काही नेते बोलत नाहीत. पण तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की माझे पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहिला, त्यामुळे काय जुने उगाच कोणाबद्दल काढावे? आज दादा नाही, त्यामुळे जुनं उणधुणं काढत बसायचं नाही. तो माझा मोठा भाऊ होता, माझ्यात दादामध्ये जी काही चर्चा झाली, ती माझ्या भावाला माहीत आहे. परंतु, आज माझा भाऊ जिथे कुठे असेल तिथे त्याला ते माहीत आहे. (Supriya Sule’s comment on NCP merger)
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहाबद्दल बोलताना सुप्रिया सुळेंनी अजितदादांच्या आशीर्वादानेच विवाह ठरला असल्याची त्यांनी माहिती दिली. ३० जानेवारीलाच विवाहाची घोषणा दादा करणार होता. पण दादा २८ जानेवारीला आमच्यात निघून गेला. मला सहा भाऊ असून सर्वांनी रेवती आणि सारंग यांच्या विवाहाला आशीर्वाद दिले आहेत, असेही त्या म्हणाल्या. (Supriya Sule’s comment on NCP merger)