Home » Blog » Modi reveals : …म्हणून ट्रम्प यांचे निमंत्रण नाकारले : मोदी

Modi reveals : …म्हणून ट्रम्प यांचे निमंत्रण नाकारले : मोदी

by प्रतिनिधी
0 comments
Modi reveals

भुवनेश्वर : ‘‘दोन दिवसांपूर्वीच मी G7 शिखर परिषदेसाठी कॅनडामध्ये होतो. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी मला फोन केला. ते म्हणाले, तुम्ही कॅनडाला आला आहात तर वॉशिंग्टन मार्गे जा. एकत्र जेवण करू, चर्चा करू, पण त्यांचे अमेरिका भेटीचे निमंत्रण नाकारले कारण मला भगवान जगन्नाथाच्या भूमीला यायचे होते.’’ (Modi reveals)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निमंत्रण नाकारले. त्यामागचे कारण उघड केले.

ते म्हणाले, ‘‘ट्रम्प यांनी मोठ्या आग्रहाने आमंत्रण दिले. मी त्यांना सांगितले, निमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद. महाप्रभूंच्या भूमीवर जाणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. म्हणूनच मी त्यांचे आमंत्रण नम्रपणे नाकारले आणि महाप्रभूंवरील तुमचे प्रेम आणि भक्ती मला या भूमीवर घेऊन आली.’’ (Modi reveals)

ओडिशातील भाजप सरकार स्थापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त भुवनेश्वर येथे झालेल्या सभेत मोदी बोलत होते. ते म्हणाले की, राज्य सरकारने ‘‘पुरी जगन्नाथ मंदिराचे चार दरवाजे, त्याचे ‘रत्न भंडार’ उघडण्याची लोकांची मागणी होती. त्या मागण्या पूर्ण केल्या. ओडिशातील पहिल्या भाजप सरकारने सुशासन आणि सार्वजनिक सेवा पुरवून एक वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केले.

काँग्रेसच्या राजवटीत भारतात सुशासनाचा अभाव होता, असा आरोपही मोदी यांनी यावेळी केला.

यजमान देशाच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी कॅनडामध्ये असताना, त्यांनी ट्रम्प यांच्याशी ३५ मिनिटांची फोनवरून चर्चा केली. ऑपरेशन सिंदूरनंतर ही पहिलीच चर्चा होती. अमेरिकेचे अध्यक्ष शिखर परिषदेतून लवकर निघून गेल्यानंतर, ही पहिलीच चर्चा होती.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या संभाषणाची माहिती दिली. “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कॅनडाहून परतताना पंतप्रधान मोदी अमेरिकेत थांबू शकतात का अशी विचारणा केली. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे पंतप्रधान मोदी यांनी तसे करण्यास असमर्थता दर्शविली. दोन्ही नेत्यांनी नजीकच्या भविष्यात भेटण्यासाठी प्रयत्न करण्याचे मान्य केले.” (Modi reveals)

त्या संभाषणादरम्यान, मोदींनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना असेही सांगितले की भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्व संपवण्याचा निर्णय द्विपक्षीय चर्चेनंतर घेण्यात आला आहे. भारत-अमेरिका व्यापार करार किंवा दोन्ही देशांमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीच्या कोणत्याही प्रस्तावावर कोणत्याही स्तरावर चर्चा झालेली नाही.

हेही वाचा :
‘बुलडोझर जस्टिस’ विरुद्धच्या निकालाने हक्कांची पाठराखण : सरन्यायाधीश
 क्लायंटला सल्ला दिला म्हणून ईडीची वकिलाला नोटीस

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00