Home » Blog » Students ISRO visit : विद्यार्थी ‘इस्रो’ भेटीसाठी विमानाने रवाना

Students ISRO visit : विद्यार्थी ‘इस्रो’ भेटीसाठी विमानाने रवाना

महापालिका शाळेचे २१ विद्यार्थी दोन दिवस घेणार माहिती

by प्रतिनिधी
0 comments
Students ISRO visit

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या शाळेतील ५६ विद्यार्थ्यांनी गतवर्षी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.  त्यापैकी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेल्या२१ विद्यार्थी बेंगळुरू येथील इस्त्रोला भेट देण्यासाठी आज सोमवारी (दि.१०) विमानाने रवाना झाले. ११ आणि १२ फेब्रुवारी या दोन दिवशी इस्त्रोला भेट देण्यात येणार आहेत. महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेने या उपक्रमाचेआयोजन केले आहे. (Students ISRO visit)

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या ५८ शाळा आहेत.  मागील अनेक वर्षांपासून मनपा शाळेतील विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्तीमध्ये यश संपादन करीत आहेत. सध्या महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील शाळांमध्ये जवळपास दहा हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ५६ विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकाविले आहे. यापैकी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेल्या २१ विद्यार्थी बंगळूरु येथील इस्त्रोला भेट देण्यासाठी महापालिकेच्या मुख्य चौकातून सोमवारी दुपारी१२ वाजता रवाना झाले. या विद्यार्थ्यांना के.एम.टी.च्या वातानुकुलीत सजविलेल्या बसमधून उजळाईवाडी विमानतळापर्यंत सोडण्यात आले. (Students ISRO visit)

या सहलीत विद्यार्थ्यांना इस्त्रोचे इस्ट्रक्ट तसेच मोक्स व पीन्या हा औद्योगिक परिसर पाहण्याची संधी मिळणार आहे. इस्ट्रक्ट या ठिकाणी ग्राउंड ऑपरेटिंग सिस्टीम यामध्ये सॅटेलाईटकडून येणारे मेसेज पृथ्वीपर्यंत कसे येतात ?, सॅटेलाईटपर्यंत कमांड कशा जातात ?, इस्रोच्या लेटेस्ट ऑपरेशनची माहिती विद्यार्थ्यांना अनुभवायास मिळणार आहे. सॅटेलाइट प्रक्षेपित करण्यासाठी वापरलेले इंजिन तसेच भारतीय बनावटीचे मॉडेल्स त्याचबरोबरच जवाहरलाल नेहरू प्लेनोटेरियममध्ये थ्रीडी शो प्लेनोटेरियमही पहावयास मिळणार आहे. विद्यार्थ्यांचा परतीचा रेल्वेने प्रवास होणार आहे. (Students ISRO visit)

या विद्यार्थ्यांसोबत प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे, प्रत्येकी एक शिक्षक, शिक्षिका व एक महिला डॉक्टर गेले आहेत. विमानतळावर एअर पोर्टच्या मॅनेजमेंटच्यावतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या प्रेरणेने आणि उपायुक्त साधना पाटील यांच्या विशेष परिश्रमांमुळे इस्त्रोची सहल आयोजित करण्यात आली आहे. सहलीतील सर्व विद्यार्थांना व शिक्षकांना क्रिडाई तर्फे सूट व बूट उपलब्ध करुन दिले आहेत.

विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार अमल महाडीक, आमदार जयंत आसगावकर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त साधना पाटील, पुष्कराज क्षीरसागर, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, माजी नगरसेवक विजय सुर्यवंशी, शेखर कुसाळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

नॅनो संमिश्रापासून सौरऊर्जा निर्मिती
बाजारात पहिल्याच दिवशी ‘आपटबार’!
 १४ कोटी भारतीय ‘अन्न सुरक्षे’बाहेर

 

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00