Home » Blog » Two terrorist killed : दोघा दहशतवाद्यांना टिपले

Two terrorist killed : दोघा दहशतवाद्यांना टिपले

उरीजवळ घुसखोरीचा प्रयत्न उधळला

by प्रतिनिधी
0 comments
Two terrorist killed

बारामुल्ला : जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न बुधवारी (२३ एप्रिल) भारतीय सैन्याने उधळून लावला. उरी नाला येथील सरजीवन भागात दोन दहशतवाद्यांना टिपले. चिनार कॉर्प्सच्या अधिकृत निवेदनानुसार, “ऑपरेशन टिक्का” दरम्यान ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळी तीन घुसखोर नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. (Two terrorist killed)

लष्कराच्या जवानांनी घुसखोरांना आव्हान दिले. त्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोघा दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. अद्याप कारवाई सुरूच आहे. सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू ठेवली आहे.

चिनार कॉर्प्सने ‘एक्स’वर पोस्ट करून घटनेला दुजोरा दिला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे, “२३ एप्रिल २०२५ रोजी बारामुल्ला येथील उरी नाला येथील सरजीवन भागातून सुमारे २-३ दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. नियंत्रण रेषेवरील सैन्याने त्यांना आव्हान दिले. त्यांना रोखले त्यावेळी गोळीबार करण्यात आला. अद्याप ऑपरेशन सुरू आहे.’’ (Two terrorist killed)

लष्कराने म्हटले आहे, ‘‘सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या मोहिमेत सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि इतर युद्धसाहित्य जप्त करण्यात आले आहे.’’

अनंतनागमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवसानंतर ही चकमक घडली आहे, जिथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले होते आणि अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे देशभरात संताप आणि निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आणि जम्मू आणि काश्मीरच्या संवेदनशील भागात सुरक्षा उपाययोजना वाढवण्यात आल्या आहेत. (Two terrorist killed)

पहलगाम हल्ल्यानंतर, सुरक्षा दलांनी या प्रदेशाच्या विविध भागात शोधमोहीम सुरू केली आहे. एकेकाळी गजबजलेल्या पर्यटनस्थळी रस्ते शांत आहेत. तणावपूर्ण वातावरणामुळे अनेक पर्यटकांनी त्यांचे दौरे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी संवेदनशील भागात पाळत ठेवणे आणि हालचालींची तपासणी वाढवली आहे.

काश्मिर खोऱ्यात कडकडीत बंद

त्याच वेळी, राजकीय पक्ष, व्यापारी संघटना आणि नागरी समाज गटांनी पीडितांप्रति संवेदना आणि या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आवाहन केल्यानंतर बुधवारी काश्मीर खोऱ्यात पूर्ण बंद पाळण्यात आला. रहिवासी आणि राजकीय नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. तो मानवतेवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. बंद व्यतिरिक्त, बारामुल्ला, श्रीनगर, पूंछ आणि कुपवाडासह अनेक जिल्ह्यांमधील रहिवाशांनी पहलगाम हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्चचे आयोजन केले. अखनूरच्या खोड गावातही निदर्शने करण्यात आली. तिथे स्थानिकांनी मेणबत्त्या पेटवून मृतांना श्रद्धांजली वाहिली. जम्मूमध्ये, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00