Home » Blog » Shaha‘s resignation : अमित शहा अपयशी गृहमंत्री

Shaha‘s resignation : अमित शहा अपयशी गृहमंत्री

राऊत यांच्याकडून शहांच्या राजीनाम्याची मागणी

by प्रतिनिधी
0 comments
Shaha‘s resignation

मुंबई : प्रतिनिधी : पहलगाममधील हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. नेहमी सरकारे पाडण्याची कटकारस्थान करणारे अमित शहा यांचे देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले आहे. राजकारणातून त्यांना लक्ष द्यायला वेळ मिळत नाहीत. ते अपयशी गृहमंत्री आहेत. या घटनेला जबाबदार असलेल्या अमित शहा यांनी राजीनामा द्यावा. या पदावर एक मिनिटही राहण्यास ते योग्य नाहीत, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. (Shaha‘s resignation)

कलम ३७० हटवून जम्मू काश्मीर केंद्रशासित राज्य केले. केंद्र सरकारचे त्यावर नियंत्रण रहावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या दुर्घटनेची जबाबदारी केंद्र सरकारवर आहे. तरीही ही दुर्घटना कशी घडली, असा सवालही राऊत यांनी केला. (Shaha‘s resignation)

ते म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये दोन ते तीन हजार पर्यटक असतानाही एकही पोलिस किंवा सुरक्षारक्षक नव्हता. मात्र अमित शहा श्रीनगर विमानतळावर उतरल्यावर त्यांच्यासोबत ७५ वाहनांचा ताफा होता. ५०० पेक्षा जास्त सुरक्षा अधिकारी गन घेऊन होते. पोलिस पथक आणि बॉम्बशोधक पथक होते. एका व्यक्तीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था होती. मात्र सामान्य माणसांसाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती ही वस्तूस्थिती आहे. (Shaha‘s resignation)

सरंक्षण खात्याचे बजेट कमी केले आहे. सैन्यात दोन लाख पदे रिक्त असूनही ती भरली जात नाहीत. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे याकडे राऊत यांनी लक्ष वेधले. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद संपत असल्याचा दावा मोदी शहा करत होते. मात्र प्रत्यक्षात जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद वाढत आहे. संसदेतही ते रेटून खोटे बोलत होते. घडणाऱ्या घटना दाबून टाकल्या जातात असा आरोपही त्यांनी केला. (Shaha‘s resignation)

भाजपच्या द्वेषाचे राजकारण जबाबदार

या हल्ल्यात मुस्लिमांचाही मृत्यू झाला आहे, याकडे लक्ष वेधताना संजय राऊत यांनी जर दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या घातल्या असतील तर त्याला भाजपचे द्वेषाचे राजकारण जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला. द्वेष आणि धर्माच्या राजकारण सुरू आहे. ते बुमरँग होण्याचा धोका आहे याकडे त्यांनी लक्ष् वेधले. भाजपने या हल्ल्याचा निषेध करण्याची नौंटकी बंद करावी. हल्ल्याला जबाबदार मोदी आणि शहांचा निषेध करावा. करारा जबाब म्हणजे नेमके काय? पुन्हा एकादा खोटा सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल का? असा प्रश्नही विचारला. (Shaha‘s resignation)

हेही वाचा :

जगभरातून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

हल्लेखोरांना सोडणार नाही

 पर्वतांवरून उतरले आणि फायरिंग सुरू केले

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00