मुंबई; प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रकमेत घसघशीत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयानुसार ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांना पाच कोटी रुपये, रौप्यपदकासाठी तीन कोटी, कांस्य पदकासाठी दोन कोटी रुपयांचे पारितोषिक, तर मार्गदर्शकांना अनुक्रमे पन्नास लाख, तीस लाख व वीस लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. (Sports News )
वरिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी सुवर्णपदक विजेत्यांना तीन कोटी रुपये, रौप्य पदकासाठी दोन कोटी, कांस्य पदकासाठी एक कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. मार्गदर्शकांना अनुक्रमे तीस लाख, वीस लाख व दहा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. एशियन गेमसाठी सुवर्णपदक विजेत्यांना एक कोटी रुपये, रौप्य पदकासाठी पंच्याहत्तर लाख, कांस्य पदकासाठी पन्नास लाख तर मार्गदर्शकांना अनुक्रमे दहा लाख, सात लाख पन्नास हजार व पाच लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
वरिष्ठ कॉमनवेल्थसाठी सुवर्णपदक विजेत्यांना सत्तर लाख रुपये, रौप्य पदकासाठी पन्नास लाख, कांस्य पदकासाठी तीस लाख तर मार्गदर्शकांना अनुक्रमे सात लाख, पाच लाख व तीन लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. युथ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्यांना तीस लाख रुपये, रौप्य पदकासाठी वीस लाख, कांस्य पदकासाठी दहा लाख तर मार्गदर्शकांना अनुक्रमे तीन लाख, दोन लाख व एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
तसेच सांघिक खेळात ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्यांना तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये, रौप्य पदकासाठी दोन कोटी पंचवीस लाख तर कांस्य पदकासाठी एक कोटी पन्नास लाख तर मार्गदर्शकांना अनुक्रमे सदतीस लाख पन्नास हजार, बावीस लाख पन्नास हजार व पंधरा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. (Sports News)
सांघिक खेळात वरिष्ठ चॅम्पियनशीपमधील सुवर्णपदक विजेत्यांना दोन कोटी पंचवीस लाख लाख रुपये, रौप्य पदकासाठी एक कोटी पन्नास लाख लाख तर कांस्य पदकासाठी पंच्याहत्तर लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे बावीस लाख पन्नास हजार, पंधरा लाख आणि सात लाख पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.सांघिक खेळात एशियन गेममध्ये सुवर्णपदक विजेत्यांना पंच्याहत्तर लाख रुपये, रौप्य पदकासाठी ५६ लाख पंचवीस हजार तर कांस्य पदकासाठी सदतीस लाख पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक तर मार्गदर्शकांना अनुक्रमे सात लाख पन्नास हजार, पाच लाख बासष्ठ हजार पाचशे रुपये व तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
सांघिक खेळात वरिष्ठ कॉमनवेल्थ स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना बावन्न लाख पन्नास हजार रुपये, रौप्य पदकासाठी सदतीस लाख पन्नास हजार, तर कांस्य पदकासाठी बावीस लाख पन्नास हजार, तर मार्गदर्शकांना अनुक्रमे पाच लाख पंचवीस हजार, तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये व दोन लाख पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.सांघिक खेळात युथ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्यांना बावीस लाख पन्नास हजार, रौप्यपदकासाठी पंधरा लाख, तर कांस्य पदकासाठी सात लाख पन्नास हजार तर मार्गदर्शकांना अनुक्रमे दोन लाख पंचवीस हजार, एक लाख पन्नास हजार रुपये व पंच्याहत्तर हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
हेही वाचा :
- इराणी चषकात द्विशतक झळकवत सरफराजची विक्रमाला गवसणी
- चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, एमएस धोनी पुढच्या आयपीएल हंगामाला मुकणार?
- अविनाश साबळे, प्रदीप गंधे यांना शिवछत्रपती पुरस्कार