Home » Blog » कांदा दरवाढीच्या मागणीसाठी महाविकास आघाडी रस्त्यांवर

कांदा दरवाढीच्या मागणीसाठी महाविकास आघाडी रस्त्यांवर

by प्रतिनिधी
0 comments
Maha Vikas Aghadi takes to the streets demanding a hike in onion prices

नाशिक : प्रतिनिधी : नाशिकच्या चांदवड येथे कांद्याच्या दरवाढीच्या मागणीसाठी आज महाविकास आघाडी रस्त्यांवर उतरली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी कांदा प्रश्नांवर विरोधक रस्त्यांवर उतरले होते. सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी आंदोलन केले. चांदवडमध्ये पोलिसांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार रोहित पवार, आमदार अंबादास दानवे यांना ताब्यात घेतल्याने आंदोलन चिघळले. (Maha Vikas Aghadi takes to the streets demanding a hike in onion prices)

देशातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिकमधील लासलगाव बाजार समितीत कांद्याचे भाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीला आला आहे. शेतकऱ्याच्या कांद्याला कवडीमोल दर मिळत आहे. कांद्याला किमान २४ रुपये मिळावा यासाठी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड चौफुली येथे आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. केंद्र सरकारने कालच कांद्याला पंधरा रुपये हमीभाव दिला आहे. हमीभाव जाहीर होण्यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याला १५ रुपये अनुदान द्यावे अशी मागणीही केली. आंदोलनात आमदार शशिकांत शिंदे, भास्कर भगरे यांच्यासह हजारो शेतकरी सहभागी झाले हाते. रस्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. (Maha Vikas Aghadi takes to the streets demanding a hike in onion prices)

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या पाठीशी उभे रहा असे शरद पवारांनी आम्हाला सांगितले आहे. नाफेडमध्ये सत्ताधाऱ्यांचे बगलबच्चे कांदा खरेदी करत आहेत. आठ ते दहा लाख टन कांदा खरेदी करा. हा कांदा देशात कुठेही विकास नाही. भारताच्या बाहेर कांदा विक्री झाली नाही तर जाळून टाका. कांदा उत्पादक संकटात असताना सत्ताधारी नेते विधान परिषदेच्या निवडीत कोणाला तिकीट द्यायचे, नगरसेवकांना किती रुपयात विकत घ्यायचे याचा विचार मुंबईत सुरू आहे अशी टीका केली. (Maha Vikas Aghadi takes to the streets demanding a hike in onion prices)

तब्बल दोन तास आंदोलन सुरू राहिल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. काही आंदोलकांनी वाहनांच्या रांगाकडे धाव घेतल्याने तणाव निर्माण झाला आहे. काही आंदोलकांनी वाहनांची हवा सोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करताच दोन्ही बाजूकडून झटापट झाली. नेतेमंडळीसह आंदोलकांनी पोलिसांनी ताब्यात घेतले.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00