Home » Blog » Split in MVA : ‘मविआ’तील फूट अटळ !

Split in MVA : ‘मविआ’तील फूट अटळ !

महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार

by प्रतिनिधी
0 comments
Split in MVA

मुंबई : जमीर काझी :  विधानसभा निवडणुकीतील दारुण अपयशानंतर अवसान गळालेल्या महाविकास आघाडीची शकले पडण्यावर अखेर  शिक्कामोर्तब झाले आहे. (Split in MVA )

घटक पक्षातील नेत्यांच्या एकमेकांवरील टिकेला २४ तास उलटण्यापूर्वीच ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ‘मविआ’ एकसंधपणे पुढील निवडणुकीत लढणार नाही, हे निश्चित झाले आहे. किंबहुना, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे निवडणुकांना एकत्रित सामोरे गेले तरी अपवाद वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठाकरे गटाचा सवतासुभा राहणार आहे. (Split in MVA )

खा. संजय राऊत यांनी शनिवारी त्याबाबतची भूमिका पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली. ते म्हणाले की, मुंबई पालिकेच्या आगामी निवडणुकांसह राज्यातील सर्व  निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. एकदा आम्हाला पाहायच आहेच. जे काही होईल ते होईल. मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्षवाढीला फटका बसतो.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असे सांगून ते म्हणाले, ‘लोकसभेत इंडिया आघाडी स्थापन केली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन केली होती. आघाडीत अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे. राऊत यांच्या या अनपेक्षित घोषणेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आता कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Split in MVA )

…तोपर्यंत भाजपाशी संघर्ष कायम : राऊत 

कोण कुठे जाणार, कोण कुठे येणार? हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत. प्रत्येक पक्षाची एक भूमिका, विचारसरणी असते. तुम्ही आमच्या पक्षाला तोडले आहे, ते कुठल्या विचारसरणीत बसते. राजकीय नेत्यांना तुरुंगात टाकण्याची परंपरा तुम्ही सोडणार असाल तर आम्ही तुमचे स्वागत करू.  मात्र जोपर्यंत तुम्ही तानाशाही करणार, भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन सरकार चालवणार तोपर्यंत आमचा संघर्ष त्यांच्याशी राहणार, असा इशाराही राऊत यांनी यावेळी भाजपाला दिला. (Split in MVA )

पक्षश्रेष्ठींच्या सल्ल्यानुसार निर्णय : खा. गायकवाड 

महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाची स्वतंत्र मते आहेत. ते त्यांच्या धोरणाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निर्णय घेऊ शकतात, पण मला त्यांची काही अडचण नाही. आम्ही सद्यस्थिती आणि पक्षश्रेष्ठींशीच्या सल्ल्यानुसार मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढवू, अशी भूमिका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी मांडली.

स्वतंत्र लढल्यास फटका बसणार : आव्हाड 

विधानसभेच्या पराभवानंतर आपण एकत्रित राहायला पाहिजे, असे  माझे मत आहे. त्यामुळे हा निर्णय फार घाईने घेतलेला दिसतोय. हा निर्णय योग्य आहे असे वाटत नाही. त्यमुळे मतविभागणीचा फटका बसू शकतो, मात्र त्यांना स्वतंत्र लढायचे असल्यास आम्ही काही करू शकत नाही, असे शरद पवार गटाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत राहणार : मुख्यमंत्री 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी कोणता निर्णय घेते? ते एकत्र लढतात की स्वबळवावर याबाबत आम्हाला काहीही पडलेले नाही. जनतेचा आशीर्वाद विधानसभेप्रमाणेच आगामी स्थानिक निवडणुकातही भाजपासोबत याची खात्री आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.(Split in MVA )

ठाकरेंची फडणवीसांशी वाढती सलगी 

२०१९ च्या निवडणुकीनंतर एकमेकांचे कट्टर वैरी बनलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आता सलगी वाढली आहे. ठाकरे यांनी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तीनदा भेटून त्यांचे अभिनंदन केले आहे. शिंदे गट आणि राज ठाकरे यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून ही खेळी केली जात असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा :

पराभवाच्या नैराशेतून ‘मविआ’मध्ये वादाच्या ठिणग्या!

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00