Home » Blog » Bhandari :२६/११ हल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात

Bhandari :२६/११ हल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात

भाजपच्या माधव भंडारींचा आरोप

by प्रतिनिधी
0 comments
Bhandari

पुणे : प्रतिनिधी : मुंबईवर २६/११ ला झालेल्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात होता, असा दावा भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला. रविवारी पुणे येथे झालेल्या विक्रम भावे यांच्या दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी आरोप केला होता. त्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली असून काँग्रेसने त्यांच्या वक्तव्याला ‘सडकछाप’ अशी टीका केली आहे.  (Bhandari)

पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात माधव भंडारी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठा आरोप केला. ते म्हणाले, मुंबईवर हल्ला होणार असल्याची कल्पना सर्वांना होती. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभाग असल्याशिवाय इतका मोठा हल्ला घडणे अशक्य आहे. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि एम.एम. कलबुर्गी या हत्याकांडाद्वारे हिंदुत्ववादी संघटना मोडीत काढण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना शिक्षा झाली. परंतु या प्रकरणात ते निर्दोष आहेत. त्यांची सुटका होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे माधव भंडारी यांनी सांगितले. (Bhandari)

दरम्यान काल रविवारी केलेल्या वक्तव्यावर  माधव भंडारी यांनी आज सोमवारी घुमजाव केले आहे. त्याबाबत त्यांनी स्पष्टीकरणही दिले आहे. काल मी जे भाषण केले आहे त्याचा वेगळा अर्थ घेतला आहे. २६/११ हल्ला होणार असल्याची शक्यता आहे अशी माहिती राज्य सरकारला होती. त्यातील ८५ टक्के जागांची माहिती होती. पाच महिने अगोदर सरकारला मुंबईवर हल्ला होणार हे माहित असून सरकारने का रोखला नाही? असा सवाल त्यांनी केला. मी कोणाचा हात आहे असे बोललो नाही. पण हेडली का पळून गेला किंवा इतर सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यावेळेस असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने दिली पाहिजेत. (Bhandari)

काँग्रेसकडून जोरदार टीका

माधव भंडारी यांच्या आरोपानंतर काँग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. ते म्हणाले, रस्त्यावरच्या सडकछाप व्यक्तीने करावे, असे हे आरोप आहेत. त्यांच्याकडे कुठला पुरावे आहे. एखादा राजकीय पक्षाविरोधात असे गंभीर आरोप करणे म्हणजे माधव भंडारी यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे. भंडारींना आमदारकी न मिळाल्याने ते वैफल्यग्रस्त आहेत, अशी टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. (Bhandari)

कोल्हापुरातही पुस्तक प्रकाशन

दरम्यान विक्रम भावे यांच्या ‘दाभोळकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे आज कोल्हापूरात प्रकाशन झाले. या पुस्तकात माझ्या अनुभवाचे चित्रण नसून, हे एका निरपराध हिंदू व्यक्तीच्या सत्यनिष्ठतेचा आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचा दस्तावेज आहे असे मत भावे यांनी व्यक्त केली आहे. या पुस्तकात तपासाची दिशा अगोदरच ठरवून टाकली होती असा आरोप भावे यांनी पुस्तकात केला होता. दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी जाहिरपणे हिंदूत्ववाद्यावर संशय व्यक्त केला होता. (Bhandari)

हेही वाचा :

ईडी मोदी-शाह यांची वसुली गँग

अमेरिकेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घोटाळ्याची चर्चा

पोलिस अधिकारी बिद्रेंच्या खुनाच्या गुन्ह्यात कुरुंदकरला जन्मठेप

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00