Home » Blog » Shivsena symbol : शिवसेना निवडणूक चिन्हावर ऑगस्टमध्ये सुनावणी

Shivsena symbol : शिवसेना निवडणूक चिन्हावर ऑगस्टमध्ये सुनावणी

by प्रतिनिधी
0 comments
Shivsena symbol

नवी दिल्ली : शिवसेनेच्या धनुष्य बाण चिन्हा संबधित खटल्याची सुनावणी आता ऑगस्टमध्ये होणार आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीपूर्वी निकाल लागणार असल्याने धनुष्यबाण चिन्ह ठाकरेंकडे जाणार की शिंदे कडे कायम राहणार की चिन्ह गोठवले जाणार याकडे शिवसेनेच्या दोन्ही गटाचे लक्ष लागले आहे. (Shivsena symbol)

भारतीय निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी २०२३ रोजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह दिले. या निर्णयाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे शिवसेना गटाला ‘मशाल’ चिन्ह देण्यात आले. शिंदे गटाला ‘धनुष्यबाण’ आणि ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह दिल्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत हीच चिन्हे शिवसनेच्या दोन्ही गटांकडून वापरण्यात आली. (Shivsena symbol)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीपूर्वी ‘धनुष्यबाण’ चिन्हाबद्दल सुनावणी व्हावी अशी विनंती उद्धव ठाकरे गटांकडून सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जाला अनुसरुन आज सोमवारी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर हा खटला दाखल करण्यात आला. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी असे सूचित केले आहे की मुख्य खटल्याची सुनावणी करुन निर्णय घेणे हाच सर्वोत्तम मार्ग असेल. त्यामुळे याचिका ऑगस्टमध्ये सूचिबद्ध करण्यात आली. तसेच या संदर्भात संध्याकाळी तारीख कळवली जाईल असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना सांगितले. (Shivsena symbol)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00