नवी दिल्ली : प्रतिनिधी : उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणातील भाजपचा माजी आमदार कुलदीप सेनगर याला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सेनगर यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची खंडपीठाने निर्णय दिला आहे. २०१७ मधील या बलात्कार प्रकरणाची नव्याने सुनावणी घेण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. (Supreme Court delivers a major blow to Kuldeep Sengar)
सर्वोच्च न्यायालयाने सेनगरची शिक्षा आणि जन्मठेपेविरुद्धच्या अपिलावर दोन महिन्याच्या आत निर्णय देण्याचे प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. अपिलावर लवकर निर्णय होत नसेल तर उच्च न्यायालयाने सेनगर याची जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर पुनर्विचार करावा असेही म्हटले आहे. (Supreme Court delivers a major blow to Kuldeep Sengar)
दिल्ली उच्च न्यायालयाने सनगरच्या जन्मठेपेची शिक्षा स्थगित करुन त्याला जामिनावर सोडण्याचा निर्णय दिला होता. या निर्णया सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. (Supreme Court delivers a major blow to Kuldeep Sengar)