मुंबई : सातारा जिल्ह्यातील सावरी गावातील रिसॉर्टवर पोलिसांनी धाड टाकून ४५ किलो ड्रग्ज पकडले. या ड्रग्ज किंमत १४५ कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाचा या प्रकरणाशी संबध असल्याचा आरोप शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. या आरोपाने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण उघडकीला आल्याने आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे अंधारे यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरक्षेची हमी द्यावी, असे आवाहनही अंधारेनी केली आहे.
वर्धा, मुलुंड, सावरीमध्ये कारवाई
सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्यावर आरोप केला आहे. अंधारे यांनी कारवाईची माहिती दिली आहे. सावरी गावात १३ डिसेंबर रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईपूर्वी ११ डिसेंबरला वर्धा आणि मुलुंड येथे कारवाई झाली. मुलुंडच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी पुण्याला कारवाई केली. पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी विशाल मोरे याला ताब्यात घेतले. विशाल मोरेचा जामीन झालेला नाही असा दावाही अंधारेंनी केली. (Shinde’s brother’s involvement in a drug case)
प्रकाश शिंदेंच्या मालकीचा रिसॉर्ट
सातारा शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर सावरी गावात पोलिसांनी कारवाई केली आहे. आपण स्वत: सावरी गावात जाऊन आल्याचे अंधारेंनी सांगितले. कोयना डॅमच्या बॅक वॉटर असून तिथे एका स्विमिंग टँकचे बांधकाम सुरू आहे. तिथे जवळच रिसॉर्टचे बांधकाम सुरू आहे. या परिसरात गाव नाही. मनुष्यवस्ती नसताना ७५ लाख रुपये खर्चुन रस्ता तयार केला आहे. रिसॉर्टच्या सात ते आठ खोल्या बांधून तयार असून तिथे एक अलिशान गाडीही पहायला मिळाली. त्याच रिसॉर्टमध्ये ४५ किलो ड्रग्ज सापडले. हे रिसॉर्ट एकनाथ शिंदे यांचे बंध प्रकाश शिंदे यांच्या मालकीचा असल्याचा दावा अंधारेंनी केला आहे. (Shinde’s brother’s involvement in a drug case)
रिसॉर्टवर काम करणारे बांग्लादेशी?
पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेल्या माहितीनुसार या रिसॉर्टवर तिघे राहत होते. आसाममधून तिघांना इथे कामांसाठी आणले होते. त्यातले काही जण बांगलादेशी असल्याचे म्हटले जाते. हे तिघे रिसॉर्टमध्ये कसले काम करत होते असा सवाल अंधारेंनी केला आहे. साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी माहिती लपवत असल्याचा आरोपही अंधारेंनी केला आहे. रिसॉर्टमधील तीन लोकांना प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या हॉटेलमधून जेवण जात होते असेही अंधारेंनी सांगितले. फाईव्हस्टार हॉटेलच्या पद्धतीचे जेवण या तिघांना का पुरवले जात होते असा सवालही अंधारेंनी केला आहे. (Shinde’s brother’s involvement in a drug case)
तिघां संशयितांची नावे पोलिसांच्या एफआरआयमध्ये नाहीत. प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलचे नाव तेजयश आहे. तेज आणि यश ही प्रकाश शिंदे यांची मुले असून त्यांच्या नावाने हे हॉटेल आहे. अंधारेनीं सर्व पुरावे प्रसार माध्यमांना दाखवली.
फडणवीस, शिंदेंची मिलिभगत असल्याचा सपकाळांचा आरोप
सुषमा अंधारेंच्या आरोपानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवधन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उप मुख्यमंत्री शिंदे यांच्या मिलीभगत असल्याचा आरोप केला. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले , सातारा पोलिसांना सावळी गावात एवढा मोठा ड्रग्जचा कारखाना सुरू होता याची कल्पना होती, पण त्यांनी कारवाई केली नाही. मुंबई क्राईम ब्रँचने ही कारवाई केली. कारण साताऱ्याचे पोलीस अधिक्षक आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. हे तेच पोलीस अधिक्षक आहेत, ज्यांनी अंतरावाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना मराठा समाजाच्या माता भगिनींवर अमानुष लाठीहल्ला केला होता. साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची मिलीभगत आहे का? या प्रश्नाचे उत्तर दोघांनी दिले पाहिजे, अशी मागणी सपकाळ यांनी केली.