Home » Blog » Tejas fighter jet crashes in Dubai : दुबईत तेजस लढाऊ विमान कोसळले ; पायलटचा मृत्यू

Tejas fighter jet crashes in Dubai : दुबईत तेजस लढाऊ विमान कोसळले ; पायलटचा मृत्यू

by प्रतिनिधी
0 comments
Tejas fighter jet crashes in Dubai

नवी दिल्ली : दुबईमध्ये सुरू असलेल्या एअर शो मध्ये प्रात्यक्षिके करत असताना भारतीय बनावटीचे एक् लढाऊ विमान कोसळले. या अपघातात विमानाचा पायलट गंभीर जखमी झाला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचे आयएफएने स्पष्ट केले आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजून दहा मिनिटाने ही घटना घडली. या घटनेने एअर शो पाहण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. (Tejas fighter jet crashes in Dubai)

दुबईत १७ ते २१ नोव्हेंबर दरम्यान ‘द फ्युचर इज हियर’ या थीम अंतर्गत दुबई वर्ल्ड सेंट्रल येथे एअर शो चे आयोजन करण्यात होते. विमान प्रदर्शनात २०० हून अधिक विमाने होती. त्यामध्ये व्यावसायिक, लष्करी, खासगी जेट, यूएव्ही विमाने मांडण्यात आली होती. या कार्यक्रमात ११५ देशातील दीड लाख व्यापारी, अभ्यासक आणि ४९० लष्करी व नागरी प्रतिनिधी उपस्थित होते. (Tejas fighter jet crashes in Dubai)

आज शुक्रवारी दुपारी एअर शो मध्ये लढाऊ तेजस विमान प्रात्यक्षिकांसाठी सज्ज होते. विमानाने उड्डाण करताच थोड्याच वेळात ते जमिनीवर कोसळले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक एअर शो पाहण्यासाठी उपस्थित होते. विमान कोसळताच मोठा आवाज झाला आणि विमानाने पेट घेतला. धुराचे लोट पहायला मिळाले. (Tejas fighter jet crashes in Dubai)

तेजस हे स्वदेशी लढाऊ विमानाची निर्मिती केली आहे. सर्वात लहान लढाऊ विमान म्हणून जगात ओळख आहे. १९८३ मध्ये तेजस या लढाऊ विमानाच्या कार्यक्रमाला मंजुरी मिळाली. पण विमानाच्या प्रकल्पाला विविध कारणांनी विलंब होत झाला. २००१ मध्ये या विमानाने पहिल्यांदा आकाशात झेप घेतली. २०१५ मध्ये तेजस एक नव्या आवृतीचे लढाऊ विमान भारतीय वायू दलात सेवेत दाखल करण्यात आले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00