Home » Blog » Shaktipith Highway : शक्तिपीठ महामार्ग विरोधाची धार तीव्र करणार: सतेज पाटील

Shaktipith Highway : शक्तिपीठ महामार्ग विरोधाची धार तीव्र करणार: सतेज पाटील

by प्रतिनिधी
0 comments
Shaktipith Highway

कोल्हापूर :  प्रतिनिधी  : शक्तिपीठ महामार्गाची  गरज नसताना हा महामार्ग लोकांच्या माथी मारला जातोय. सरकारने या महामार्गच्या भुसंपादनाला नव्याने मान्यता दिली असली तरी आमचा याविरोधातील लढा चालूच राहील. उलट हा लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशारा काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना दिला. (Shaktipith Highway)

आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूरमधून जाणारा जो महामार्ग विधानसभे निवडणुकीच्या आधी रद्द केला होता. शक्तीपीठ महामार्ग हा गरज नसलेला हा रस्ता आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, नागपूर हायवे असताना या रस्त्याची गरज नाही. ८६ हजार कोटी रुपये खर्च करून हा रस्ता करण्यापेक्षा महाराष्ट्रातले असलेले रस्ते दुरुस्त करावेत. सध्याच्या महामार्गावर पडलेले खड्डे भरावेत. कॉन्ट्रॅक्टरांची अजून बिले सरकारने दिलेली नाहीत. मग हा हट्ट कशासाठी? सांगली- कोल्हापूरला महापुराचा फटका अनेक ठिकाणी या रस्त्यांमुळे बसणार आहे. या रस्त्याला अगोदरच पर्यायी रस्ते, रत्नागिरी -नागपूर महामार्ग आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही. या रस्त्याची मोजणी अडवली म्हणून धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना अटक केली जाते ही सरकारची दडपशाही आहे. (Shaktipith Highway)

खड्डे भरण्यासाठी २० हजार कोटी द्या

या सरकारची प्राथमिकता कॉन्ट्रॅक्टर धार्जिणी आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी नाही. महाराष्ट्राच्या जनतेला काय पाहिजे? त्याचा विचार केला जात नाही. आमची सरकारला मागणी एवढीच आहे की २० हजार कोटी रुपये राज्यातल्या सगळ्या रस्त्यांना खड्डे भरण्यासाठी द्या. मोडकळीला आलेल्या एसटी महामंडळासाठी नवीन एसटी बसेस प्रवाशांना देण्याची व्यवस्था करा. राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नाहीत ते उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी आमदर सतेज पाटील यांनी केली. (Shaktipith Highway)

सत्ताधारी आमदारांचाही विरोध

लोकसभेच्या आधी हे आंदोलन कोल्हापूरातून सुरू केले होते. आझाद मैदानावर आम्ही मोर्चा नेला. त्यावेळी देखील सर्वपक्षीय आमदार यामध्ये होते. सत्ताधारी आमदार खासगीत सांगतात की, आमचा विरोध आहे परंतू जाहीरपणे बोलू शकत नाही. आम्ही जाहीर विरोध करू शकत नाही असे ते सांगतात. मला अनेक लोक भेटलेले आहेत. ते म्हणतात की आम्ही विरोध करू शकत नाही, परंतु खाजगीत ते मान्य करतात की या रस्त्याची गरज नाही, असा दावाही सतेज पाटील यांनी केला. (Shaktipith Highway)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00