जयसिंगपूर : प्रतिनिधी : शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांची ५०० एकर जमीन असल्याचा आरोप केला आहे. या आरोपाला प्रत्युत्तर देताना शेट्टी यांनी ५०० एकर जागा जागा त्याच्या नावावर करण्याची घोषणा केली आहे. राजू शेटृटी यांनी एका पत्रकातून क्षीरसागर यांना आव्हान दिले आहे. (Shetty’s challenge to Kshirsagar)
पत्रकारत राजू शेट्टी यांनी असे म्हटले आहे की, शक्तीपीठ महामार्गाचे समर्थन करताना आमदार राजेश क्षीरसागर इतके वाहवत गेले आहेत कि माझी ५०० एकर जमीन असल्याचा जावईशोध त्यांनी लावला आहे. सदर ५०० एकराचे सात बारे घेऊन २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता मी स्वत: बिंदू चौकात हजर राहणार आहे. आमदार क्षीरसागर यांनी बिंदू चौकात यावे. ती सर्व ५०० एकर जमीन मी त्यांच्या नावावर करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली. (Shetty’s challenge to Kshirsagar)
कोल्हापूर शहरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्याकडे ५०० एकर जमीन असल्याचा आरोप प्रसार माध्यमातून केला. याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि मी गेल्या २५ वर्षात सार्वजनिक क्षेत्रात पाच निवडणुका लढविल्या. त्या निवडणुकीत मी माझ्या चल व अचल संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे. त्या विवरणपत्रा व्यतिरिक्त राजेश क्षीरसागर यांनी आरोप केलेल्या ५०० एकर जमीनीचे सात बारे त्यांनी दाखवावे.
राजू शेट्टी हे दोन दिवस दौ-यानिम्मीत्ताने जिल्ह्याबाहेर आहेत. येत्या २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता राजू शेट्टी स्वत: बिंदू चौकात हजर राहणार आहेत. आमदार राजेश क्षीरसागर यांनी लोकसभेतील विवरण पत्राव्यतिरिक्त ५०० एकर जमीनीचे सात बारे त्यांनी दाखवावे ती सर्व जमीन राजेश क्षीरसागर यांचे नावे बक्षिसपत्र करणार आहेत. जर राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी दुपारी १२ वाजता बिंदू चौकात न आल्यास त्यांनी त्यांच्या नावे असणारी सर्व संपत्ती करवीर निवासनी आई अंबाबाई मंदिराच्या नावे करावी असे आव्हानही शेट्टी यांनी राजेश क्षीरसागर यांना केले आहे. (Shetty’s challenge to Kshirsagar)