महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र पाठोपाठ झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. झारखंडमध्ये दोन टप्यांत मतदान होणार आहे. यामध्ये पहिल्या टप्यातील मतदान १३ नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्यातील मतदान २० नोव्हेंबरला होणार आहे. तर, मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे. (Jharkhand Assembly Election 2024)
राज्यात ११.८४ लाख नवमतदार
पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, झारखंड विधानसभेची मुदत ५ जानेवारी २०२५ ला संपवणार आहे. यंदा ११.८४ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. झारखंडमध्ये २४ जिल्ह्यांत एकूण ८१ विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये एकूण २.६ कोटी मतदार आहेत. यामध्ये १.१४ लाख मतदार हे ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. तर मतदान प्रक्रियेसाठी राज्यात २९ हजार ५६२ मतदान केंद्रे आहेत.
गेल्या वेळी पाच टप्यात झाली होती निवडणूक
२०१९ साली झालेल्या झारखंड विधानसभेच्या निवडणूकीसाठी पाच टप्प्यात मतदान झाले होते. यानंतर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) च्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आले. यामध्ये काँग्रेस, आरजेडी आणि डावे पक्ष यांचा समावेश आहे. नुकताच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वाखालील पथकाने नुकताच झारखंडचा दौरा केला होता. आयोगाच्या पथकाने सर्व पक्षांकडून निवडणुकीबाबत अभिप्रायही घेतला होता. दिवाळी, छठ तसेच राज्य निर्मितीचा दाखला देत १५ नोव्हेंबरनंतर निवडणुका घेण्याचे आवाहन राज्यातील नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या पथकाला केले होते.
झारखंड विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ला संपत आहे. झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा आहेत. यामुळे राज्यात बहुमतासाठी ४१ जागा जिंकणे आवश्यक आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा ३०, भाजप २५, काँग्रेस १६, जेव्हएम ३, एजीएसयूपी २ इतर ५ असे बलाबल होते.
Schedule for General Election to Legislative Assembly of #Jharkhand to be held in two phases.
Details in images👇#JharkhandAssemblyElections2024 #ECI #Schedule pic.twitter.com/mVOfJ5D7Pw
— Election Commission of India (@ECISVEEP) October 15, 2024
हेही वाचा :
- महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान, २३ ला निकाल
- राज्याला दिशा देण्यात फलटणकर नेहमीच अग्रभागी : शरद पवार
- ‘मेक इन इंडिया’ योजना ठरली ‘फेक इन इंडिया’ : जयराम रमेश