Home » Blog » चीनचे राष्ट्राध्यक्ष  मोदीसोबत झोके घेत होते, तेव्हा चीनकडून फंडिंग झाले का?

चीनचे राष्ट्राध्यक्ष  मोदीसोबत झोके घेत होते, तेव्हा चीनकडून फंडिंग झाले का?

by प्रतिनिधी
0 comments
Sapkal criticizes Fadnavis over China funding

जमीर काझी : मुंबई : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत साबरमतीच्या काठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी झोके घेत होते, तेव्हा चीनकडून त्यांना फंडिंग झाले होते का? याचे उत्तर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला द्यावे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी चीनचे एजंट असल्याचा आरोप ठाण्यातील मोर्चात केला होता.त्याला ट्विट करून प्रत्युत्तर देताना भाजपवर हल्ला केला आहे. (Sapkal criticizes Fadnavis over China funding)

ट्विट वर हर्षवर्धन सपकाळ यांनी असे म्हटले आहे की, राहुल गांधी  यांच्या नेतृत्वाखाली राजधानी दिल्लीत आयोजित ‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीत लाखो लोक सहभागी झाले आहेत. दिल्लीच्या रामलीला मैदानावर उसळलेला हा जनसागर आता मतचोरांना गजाआड केल्याशिवाय शांत बसणार नाही, याची जाणीव झाल्याने मतचोरीच्या जोरावर सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ते वाटेल तसे बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत. (Sapkal criticizes Fadnavis over China funding)

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत साबरमतीच्या काठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी झोके घेत होते, तेव्हा चीनकडून त्यांना फंडिंग झाले होते का? फडणवीसांनी याचेही उत्तर द्यावे.राज्यातील अडीच कोटी मृत मतदारांची नावे एसआयआरमधून वगळण्यात आली, असा जावईशोध मुख्यमंत्र्यांनी लावला आहे. कोणतीही वस्तुस्थिती तपासल्याशिवाय ते बिनधास्त खोटे बोलत आहेत.काँग्रेस पक्षाने एकही बीएलए  नियुक्त केला नाही, हा मुख्यमंत्र्यांचा दावाही धादांत खोटा आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडून अधिकृत माहिती घेतली असती, तर काँग्रेस पक्षाचे तब्बल ५६ हजार बीएलए कार्यरत आहेत, हे त्यांना समजले असते. मात्र, सातत्याने खोटे बोलण्याची सवयच त्यांना जडली आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबाबतचे खोटे ट्विट डिलीट करण्याची वेळ फडणवीसांवर आली. आता आजच्या भाषणातील बिनबुडाचे आरोपही त्यांना मागे घ्यावे लागतील.त्यामुळे फडणवीसजी, तुम्हाला एवढेच सांगणे आहे. गेट वेल सून! असे शेवटी म्हटले आहे. (Sapkal criticizes Fadnavis over China funding)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!