Home » Blog » Sandip Deshpande : मनसे नेत्यांने आमदारांना ‘षंढ’ म्हटंले

Sandip Deshpande : मनसे नेत्यांने आमदारांना ‘षंढ’ म्हटंले

by प्रतिनिधी
0 comments
Sandip Deshpande

मुंबई : प्रतिनिधी :  हिंदी भाषेची सक्ती या प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून आज मुंबईत या निर्णयाविरोधात सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. याच मुद्द्यावरुन विधीमंडळातील आमदारांना उद्देशन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आमदारांना ‘षंढ’ असे संबोधल्याने त्यावर लोकप्रतिनिधीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मंत्री गुलाबराव देशमुख यांनी देशपांडे यांच्याविरोधात हक्कभंग ठराव आणण्याचा इशारा दिला आहे. (Sandip Deshpande)

संसदेच्या अंदाज समितीला ७५ वर्ष पूर्तीनिमित्त आज विधानभवनात लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्यावेळी लावण्यात आलेल्या फलकावर केवळ हिंदी आणि इंग्रजीमध्ये मजकूर लिहिण्यात आला होता. त्यावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आमदारांचा उल्लेख षंढ असा केला आहे. फलकावरील मजकुरांवरुन देशपांडे म्हणाले, सर्व मराठी माणसांना आमचे आवाहन आहे की तुम्ही जर मराठी असाल तर रस्त्यांवर उतरा. सरकारमध्ये सर्व षंढ लोक बसले असतील तर मराठी माणसाने करायचे काय? असा सवाल देशपांडे यांनी केला. (Sandip Deshpande)

मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे दुर्देव आहे की राज्य सरकारला अजूनही हिंदीबद्दल का प्रेम आहे हे कळत नाही. मराठी माणसांनी तुम्हाला निवडून दिले आहे हे तुम्ही विसरु नये. ज्यांनी निवडून दिले आहे ते तुम्हाला घरी पण बसवू शकतो हे लक्षात घ्यावे, असेही देशपांडे म्हणाले. हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावे अन्यांना आम्ही रस्त्यांवर उतरू. मराठी माणसाला आणि मनसे सैनिकांना आवरणे सरकारला कठीण होईल, असा इशाराही देशपांडे यांनी दिला. (Sandip Deshpande)

देशपांडे यांच्या वक्तव्याला शिवसेनेचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले. विधानसभेतील कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिला हे उपस्थित असताना त्यांनाही षंढ म्हणणे उचित आहे का? सभागृहातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, आमदार हे षंढ आहेत का? असा सवाल मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. कोणाला षंढ म्हणणे त्यांना हुशारकी वाटेत तर असेल तर आम्हालाही खालच्या पातळीवर बोलता येते. हा सभागृहाचा अपमान झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बरेचशे आमदार यावर हक्कभंग आणल्याशिवाय आणि देशपांडेने त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. (Sandip Deshpande)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00