Home » Blog » डीजे,डॉल्बी फेकून द्या, त्यामधून देशाला काय मिळते?

डीजे,डॉल्बी फेकून द्या, त्यामधून देशाला काय मिळते?

by प्रतिनिधी
0 comments
Sambhaji Bhide criticizes DJs

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी गणेशोत्सव आणि डीजे आणि दहीहंडी कार्यक्रमातील अश्लील नृत्यांवर परखड टीका केली. डीजे, डॉल्बी फेकून दिले पाहिजेत, त्याचा काय उपयोग आहे? देशाला त्यामधून काय मिळते? असा सवाल केला. दहीहंडी कार्यक्रमात नृत्यांगना नाचवणारे देशद्रोही आहेत अशी टीकाही त्यांनी केली. (Sambhaji Bhide criticizes DJs)

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील एमआयडीसी च्या विरोधात सर्वपक्षीय आंदोलन झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ध्वनीप्रदूषणावर परखड मत व्यक्त केले. डीजे, डॉल्बी फेकून दिले पाहिजेत. त्या डीजे आणि डॉल्बीचा उपयोग काय आहे. त्यामधून देशाला काय मिळते, डीजे आणि डॉल्बी हा मला मुर्खपणा वाटतो. सगळ्या काळ्या शक्ती गाडण्यासाठी काही गोष्टी नाकारल्या पाहिजेत. (Sambhaji Bhide criticizes DJs)

मुंबई, पुण्यासह सातारा आणि राज्यात दहीहंडी उत्सवात नृत्यांगणा कार्यक्रमांवर त्यांनी राज्यकर्त्यांवर कडवट टीका केली. दहीहंडी उत्सवात नृत्यांगणा नाचवणे हा मुर्खपणा आहे. या कार्यक्रमात नृत्यांगणा नाचवणारे देशद्रोही आहेत.

एमआयडीसी विरोधात सैनिक टाकळीत राडा…. सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात राडा झाला. संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आक्रमणाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी शिरोळ प्रशासकीय कार्यलयाचे लोखंडी गेट तोडले. तसेच प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या काचा फोडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करताच त्यांनी कार्यालयाच्या परिसरात ठिय्या मांडला. यावेळी आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्याविरोधात आंदोलकांनी घोषणा दिल्या. आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. (Sambhaji Bhide criticizes DJs)

You may also like

error: Content is protected !!