नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीन यांच्यावर व्यापक व्यापार युद्धाची भीती निर्माण केली आहे. त्याच्या अवघ्या एकाच दिवसात भारतीय रुपयाची घसरगुंडी दिसून आली. सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सुरुवातीच्या व्यापारात रुपया ६७ पैशांनी घसरली. डॉलरच्या तुलनेत त्याची किमत ८७.२९ इतकी विक्रमी नीचांकी झाली आहे. (Rupee hits low)
आंतरबँक परकीय चलनात, रुपया डॉलरच्या तुलनेत ८७.०० वर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात तो ८७.२९ वर घसरला. दरम्यान, शुक्रवारी तो अमेरिकन चलनाच्या तुलनेत ८६.६२ वर स्थिर झाला स्थिर झाला होता.
ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर २५% आणि चीनवर १०% आयात शुल्क लावले आहे. विध्वंसक जागतिक व्यापार युद्ध काय असू शकते याची ही पहिली झालक आहे, असे विदेशी मुद्रा व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांचे हे धोरण असेच सुरू राहिले तर त्यांचा फटका अनेक देशांना बसणार आहे.(Rupee hits low)
शनिवारीच ₹१,३२७.०९ कोटी रुपयांच्या विदेशी निधीचा सतत प्रवाह सुरू होता. त्याच तेल आयातदारांकडून डॉलरची मागणी आणि कमकुवत जोखीम भूक यामुळे विदेशी बाजारपेठेतील अमेरिकन चलनाची ताकद वाढली. यामुळे रुपयालाही या दबावाचा सामना करावा लागला. जागतिक वायदे बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलही ०.७१% वाढून ७६.२१ डॉलर प्रति बॅरल झाले आहे. त्याचाही दबाव रुपयाला सहन करावा लागत आहे.(Rupee hits low)
दरम्यान, सहा चलनांच्या बास्केटच्या तुलनेत ग्रीनबॅकची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक १.३०% वाढून १०९.७७ वर व्यापार करत होता.
Finrex Treasury Advisors LLPचे ट्रेझरी प्रमुख आणि कार्यकारी संचालक अनिल कुमार भन्साळी यांनी म्हटले आहे की, ‘सोमवारी दिवसाची रेंज ८६.६५/८७.०० च्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. रिझर्व्ह बँकेने डॉलरच्या बिड्स थंड करण्यासाठी हस्तक्षेप करणे अपेक्षित आहे.
दरम्यान, २४ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा ५.५७४ अब्ज डॉलरने वाढून ६२९.५५७ अब्ज डॉलर झाला आहे, असे रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :
साखर उद्योगासाठी अपेक्षाभंग
विकसित भारतास पूरक अर्थसंकल्प