Home » Blog » Om Prakash : पोलिस अधिकाऱ्याची राहत्या घरी हत्या

Om Prakash : पोलिस अधिकाऱ्याची राहत्या घरी हत्या

प्राथमिक तपासात पत्नीवर संशय

by प्रतिनिधी
0 comments
Om Prakash

बेंगळुरू : प्रतिनिधी :  कर्नाटकचे माजी पोलिस उपमहानिरीक्षक आणि पोलिस महानिरीक्षक ओम प्रकाश यांच्या रविवारी सायंकाळी बेंगळूरू येथील त्यांच्या निवासस्थानी हत्या झाल्याचे उघडकीस आले. पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी हत्या झाल्याच्या घटनेचा पृष्टी दिली असून प्रकाश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यांच्या पत्नीवर संशय व्यक्त केला जात आहे. (Om Prakash)

कर्नाटक राज्याचे माजी पोलिस उपमहानिरीक्षक आणि पोलिस महानिरीक्षक ओम प्रकाश यांची रविवारी संध्याकाळी एचएसआर लेआउट येथील त्यांच्या घरात हत्या झाल्याचे आढळले. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात ते आढळले. साक्षीदारांच्या मते, प्रकाश यांची हत्या त्यांच्या पत्नीने केली आहे. त्यांच्या अंगावरील जखमा चाकूने झाल्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (Om Prakash)

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही अद्याप साक्षीदारांशी बोललेले नाही. एकदा आम्हाला तपशील मिळाला की, आम्ही घटनेवर भाष्य करू शकतो.” पोलिस आयुक्त बी.दयानंद आणि इतर वरिष्ठ अधिकारी प्रकाश यांच्या निवासस्थानी धाव घेतली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्रकाश यांच्या पत्नीने एक व्हॉट्सअॅप मेसेज शेअर केला होता.  ज्यामध्ये म्हटले होते की त्यांचा पती घरात बंदुक घेऊन फिरत होता आणि त्यांना मारण्याचा त्यांचा हेतू होता. असा संशय आहे की ती मानसिक आजाराने ग्रस्त होती, परंतु आम्हाला अद्याप तिच्या वैद्यकीय स्थितीची पुष्टी मिळालेली नाही. (Om Prakash)

घटनास्थळी पोहोचलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्नीची चौकशी सुरू केली आहे. १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी प्रकाश यांनी २०१५ पासून जवळजवळ दोन वर्षांनी निवृत्त होईपर्यंत कर्नाटक राज्याचे डीजीपी आणि आयजीपी म्हणून काम पाहिले. (Om Prakash)

मूळचे बिहारचे रहिवासी असलेले प्रकाश यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात तत्कालीन बल्लारी जिल्ह्यातील हरपनहल्ली येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून केली आणि नंतर एसपी शिवमोगा, उत्तरा कन्नड आणि चिक्कमंगलुरूसह विविध ठिकाणी काम केले. त्यांनी लोकायुक्तमध्ये आणि अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) डीआयजी म्हणूनही काम केले. मार्च २०१५ मध्ये राज्य पोलिस प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते २०१७ मध्ये निवृत्त झाले. (Om Prakash)

हेही वाचा :

पोलिसांने सहकाऱ्यांवर झाडल्या ११ गोळ्या

मंत्री मंगलप्रसाद लोढा निव्वळ नाटक करतात

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00