मुंबई : प्रतिनिधी : खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याने दोन महिने उपचार आणि विश्रांती घेणार असल्याने त्यांनी सोशल मिडियावर पत्रक प्रसिद्ध केल्यावर लवकर बरे व्हावेत यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रार्थना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊत लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना केली आहे. त्याबद्दल राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. (Modi’s prayer)
२०१९ पासून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून खासदार संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी आणि पक्ष विरोधकांवर टीकेचे आसूड ओढतात. त्यांच्या जहरी टीकेमुळे घायाळ झालेल्या विरोधकांनी ‘सकाळचा भोंगा’ असा उल्लेख करत असत. पण आता प्रकृतीच्या कारणास्तव पुढील दोन महिने पत्रकार परिषद घेणार नाहीत. तसेच ते सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार आहेत. (Modi’s prayer)
खासदार राऊत यांनी ‘एक्स’ वर पोस्ट केली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यांनी पत्रकात असे म्हटले आहे की, सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत आणि मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. पण मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या, असे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. (Modi’s prayer)
संजय राऊत यांनी केलेल्या पोस्टनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘एक्स’ वर पोस्ट करुन संजय राऊत तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो. मोदींच्या पोस्टबद्दल राऊत यांनी आभार मानले. आदरणीय प्रधानमंत्री जी धन्यवाद! मेरा परिवार आपका आभारी है! जय हिंद, जय महाराष्ट अशी पोस्ट करुन आभार मानले आहेत. (Modi’s prayer)