Home » Blog » Raj Thackeray warns: अहवाल काहीही येवो, हिंदी लादू देणार नाही : राज

Raj Thackeray warns: अहवाल काहीही येवो, हिंदी लादू देणार नाही : राज

by प्रतिनिधी
0 comments
Raj Thackeray warns

मुंबई : विशेष प्रतिनिधी : त्रिभाषा सूत्र लागू करण्यासंदर्भात समिती नेमली आहे. त्या समितीचा निर्णय काहीही होवो, महाराष्ट्रात हिंदीची सक्ती लागू करू दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी (३० जून) माध्यमांशी संवाद साधताना दिला. (Raj Thackeray warns)

इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला, अशा भावनाही राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केल्या. रविवारी (२९ जून) सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर सोमवारी (३० जून) राज यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Raj Thackeray warns)

ते म्हणाले, हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे. त्याबद्दल तमाम मराठी जनांचे मनापासून अभिनंदन. येत्या ५ तारखेला विजयी मेळावा होईल. या मेळाव्यात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मेळावा असेल. अजून एक गोष्ट मी पुन्हा एकदा सांगितली ती म्हणजे सरकारने जी काही नवीन समिती नेमली आहे तिचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवली जाणार नाही हे नक्की.

तमाम मराठी बांधव, साहित्यिक, काही मोजके कलावंत, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांनी ५ तारखेच्या मोर्चाला पाठींबा दिल्याबद्दल ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले. (Raj Thackeray warns)

असल्या भानगडी करायची सरकारला खरेतर गरजच नव्हती. आता यापुढे असल्या भानगडी सरकार करायला धजावणार नाही. सरकारने समिती नेमावी, काय करायचे ते करावे, समितीचा निर्णय काहीही होवो, पण यापुढे हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही म्हणजे नाही, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

सगळे उत्तर भारतीय महाराष्ट्रात रोजगारासाठी येतात. तेव्हा त्या सरकारने मराठी शिकण्याची सक्ती करावी, असे ते म्हणाले. बाकी ५ तारखेचा विजयी मेळावा होईल, त्याचे तपशील लवकरच कळवण्यात येतील. मेळावा जरी झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावण्यात अर्थ नाही. मराठी माणसाचा हा विजय आहे, त्यादृष्टीने या विषयाकडे पाहायला पाहिजे, माध्यमांनीही चांगला पाठींबा दिला. त्याबद्दल राज ठाकरे यांनी धन्यवाद दिले.

हेही वाचा :
बहुमताचा माज मराठी भाषिकांनी उतरवला
मोदी सरकारच्या दडपशाहीमुळे गुंतवणुकीला खीळ : काँग्रेस

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00