Home » Blog » Congress criticizes on Census: जनगणनेची अधिसूचना हा फुसका बार

Congress criticizes on Census: जनगणनेची अधिसूचना हा फुसका बार

by प्रतिनिधी
0 comments
Congress criticizes on Census

नवी दिल्ली : केंद्र सरकारने काढलेली १६ व्या जनगणनेची राजपत्रित अधिसूचना म्हणजे फुसका बार असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. तसेच या जनगणनेत  जातीच्या समावेशाचा अभाव असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. जनगणनेसाठी तेलंगणा मॉडेल स्वीकारण्याचा आग्रहही पक्षाने केला आहे. (Congress criticizes on Census)

काँग्रेसने सोमवारी (१६ जून) अधिसूचनेवर टीका करताना म्हटले आहे की, या प्रक्रियेत जातीचा समावेश करण्याबाबत सरकारने मौन बाळगले आहे. सरकारचा हा आणखी एक ‘यू-टर्न’ आहे का, असा प्रश्नही विचारला.

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने म्हटले आहे की, केंद्राने केवळ जातीय गणनासाठीच नव्हे तर जातीनिहाय सामाजिक-आर्थिक मापदंडांची तपशीलवार माहिती समजून घेण्यासाठी तेलंगणा मॉडेलचा अवलंब केला पाहिजे. (Congress criticizes on Census)

काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी जयराम रमेश म्हणाले की, २०२६ च्या अखेरीस किंवा २०२७ च्या सुरुवातीला होणाऱ्या १६ व्या जनगणनेची बहुचर्चित राजपत्र अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. तो फुसका बार आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

यासंबंधीची पोस्ट रमेश यांनी ‘एक्स’वर केली आहे.

ते म्हणाले की, काँग्रेसच्या चिकाटी आणि आग्रहामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीय जनगणनेच्या मागणी मागणी केली. त्यांची ही सपशेल शरणागती होती.

जातनिहाय जनगणनेची मागणी केल्याबद्दल त्यांनी (मोदींनी) काँग्रेस नेत्यांवर शहरी नक्षलवादी अशी टीका केली होती. संसदेत आणि सर्वोच्च न्यायालयातही मोदी सरकारने जातीय जनगणनेची कल्पनाच नाकारली होती. पण ती त्यांनी ४७ दिवसांपूर्वी जाहीर केली होती, याकडे रमेश यांनी लक्ष वेधले.

‘‘ केंद्र सरकारने जारी केलेल्या आजच्या अधिसूचनेत मात्र जनगणनेत जातीचा समावेश करण्याबाबत मौन आहे. हा उस्तादांचा (मोदींचा) आणखी एक यु-टर्न आहे का? की तपशील नंतर जाहीर केला जाईल?’’ असा सवाल रमेश यांनी केला आहे. (Congress criticizes on Census)

काँग्रेसचा असा ठाम विश्वास आहे की १६ व्या जनगणनेत केवळ जात गणना करण्यासाठीच नव्हे तर जातीनिहाय सामाजिक-आर्थिक मापदंडांची तपशीलवार माहिती बाहेर आणण्यासाठी तेलंगणा मॉडेलचा अवलंब केला पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. सरकारने सोमवारी (१६ जून) भारताची १६ वी जनगणना करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. जवळपास १६ वर्षांनी ही जनगणना होणार आहे.

हेही वाचा :
जनगणना होणार या तारखेपासून…
लाज बाळगा; महाराष्ट्र सरकारला सुनावले

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00