Home » Blog » India defeated : खराब फलंदाजीने भारत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत

India defeated : खराब फलंदाजीने भारत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत

by प्रतिनिधी
0 comments
India defeated

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे झालेल्या टी-२० क्रिकेट सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने चार गड्यांनी सहज विजय मिळवला. भारताच्या स्टार खेळाडूंनी केलेल्या खराब फलंदाजीने भारताचे १२५ धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रेलियाने चौदाव्या षटकात पार केले. भारताच्या अभिषेक शर्माने धडाकेबाज फलंदाजी करुत ६८ धावा करत भारताचे आव्हान कसेबसे राखण्याचा प्रयत्न केला.  ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने तीन गडी बाद करत सामना फिरवला. (India defeated)

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलला हेझलवूडने पाच धावा असताना तंबूचा रस्ता दाखवला. संजू सॅमसनला नॅथन एलिसने पायचित पकडले. कर्णधार सूर्यकुमार यादवला हेझलवूडने चकवले. यष्टीरक्षक जोश इंगलिसकडे त्याने झेल दिला. सूर्यकुमार फक्तच एकच धाव करु शकला. तिलक वर्मा आणि अक्षर पटेल स्वस्तात बाद केले. भारताची पाच बाद ४९ धावसंख्या असताना अभिषेक शर्मा आणि हर्षित राणाने भारताचा डाव सावरला. अभिषेक शर्माने ३७ चेंडूत ६८ धावा केल्या. त्याला हर्षित राणाने चांगली साथ दिली. राणाने ३३ चेंडूत ३५ धावा केल्या. दोघांनी सहाव्या गड्यासाठी ५६ धावांची भागिदारी केली. अभिषेकने वेगवान आणि फिरकी गोलंदाजांना लक्ष्य करत चौकारांची आतषबाजी केली. १८ व्या षटकात अभिषेकला एलिसने बाद केले. राणा झेवियर बार्टलेटच्या गोलंदाजीवर बाद झाला. दोघे बाद झाल्याने भारताचा डाव १८.४ षटकात १२५ धावांवर आटोपला. (India defeated)

भारताचे माफक आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज पार केले. कर्णधार मिचेल मार्शने २६ चेंडूत ४६ धावा चोपत संघाच्या विजयाची वाट सुकर केली. दोन चौकार आणि चार षटकार खेचले. ट्रॅव्हिस हेडने २८ धावा केल्या. वरुण चक्रवर्तीने दोन गडी बाद केले. सहा गडी गमावून ऑस्ट्रेलियाने भारताची धावसंख्या पार केली. जसप्रित बुमराहने शेवटच्या टप्प्यात दोन गडी बाद केले. भारतावर विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने १-० अशी मालिकेत आघाडी घेतली. (India defeated)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00