नागपूर : प्रतिनिधी : महायुती सरकारच्या पहिल्या एक वर्षाच्या कार्यकाळात राज्य अधोगतीला गेले आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केला. राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर ८२ हजार रुपयांचे कर्ज असून आठ महिन्यात अर्थसंकल्पातील ४२ टक्के निधी खर्च केला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. (During the Mahayuti period, the state went into decline)
विधान परिषदेत बोलताना सतेज पाटील यांनी सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना सरकारच्या कारभाराचा पर्दापाश केला. अर्थसंकल्प करत असताना सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक होते. आकस्मित खर्चासाठी पुरवण्या मागण्या करायच्या असतात. मात्र ११ विभागांनी पुरवणी मागण्यांवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे, असा आरोप केला. या विभागांना एकूण पुरवणी मागण्यांच्या ८५ टक्के निधी दिला आहे. या ११ विभागांना मार्चच्या बजेटमध्ये का तरतूद करण्यात आली नाही असा सवाल पाटील यांनी केला. (During the Mahayuti period, the state went into decline)
अधिवेशनात सरकारने ७५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. यातील किती पैसे तीन महिन्यात खर्च होतील, अशी शंका सतेज पाटील यांनी उपस्थित केली. शेतकरी आत्महत्या करत असताना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना किती मदत पोहोचली याची आकडेवारी सरकारने दिली नाही. महानगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर नगरविकास खात्याला मात्र नऊ हजार कोटी रुपये दिले आहेत असा आरोप सतेज पाटील यांनी केला. (During the Mahayuti period, the state went into decline)